संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटे पाच वाजता श्रींचा अभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवसभर भक्तांनी श्री महागणपतीचे दर्शन घेत संकष्टीचे व्रत पूर्ण केले. या निमित्ताने श्री महागणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ […]

अधिक वाचा..
ramdas-thite

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बौद्धिक क्षमतेइतकेच शारीरिक सदृढतेलाही महत्त्व आहे. ध्येयपूर्तीसाठी सातत्य, समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न या मूल्यांची जोड आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या शिक्रापूर शाखेच्या […]

अधिक वाचा..

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य 

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील मुख्य ड्रेनेज लाईन गेल्या आठ दिवसांपासून खराब झाल्याने अनेक सोसायट्यांमध्ये सांडपाणी तुंबले आहे. रस्त्यांवरुन वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, ठिकठिकाणी निर्माण झालेली डबकी आणि कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र, एवढी गंभीर परिस्थिती […]

अधिक वाचा..

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई येथील युवा उद्योजक व समाजसेवक अमोल रामदास पुंडे यांनी विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप केले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुलभ होणार असून परिसरात त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

अधिक वाचा..

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोचालकाचा टेम्पो आणि रॅम्पच्या दरम्यान अपघात झाल्याने चेंगरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि १९) जुलै रोजी घडली होती. या घटनेनंतर मृत चालकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, कामगार नेते नानासाहेब लांडे यांनी कंपनी प्रशासनासोबत केलेल्या पाठपुराव्यामुळे मृत चालकाच्या […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सचिवपदी सुदर्शन दरेकर यांची नियुक्ती

शिरुर (तेजस फडके): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, समाजाप्रती उत्तरदायित्व जपणारा पत्रकार हा जागरूक आणि प्रभावी घटक मानला जातो. अशा परिस्थितीत युवा पत्रकारांना संघटित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा नुकतीच शिरूर येथे पार पडली. संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बोअरवेलवरुन मंडप व्यावसायिकाला मारहाण करत गोळ्या घालण्याची धमकी 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथे ग्रामसभेने गावात बोअरवेल घेण्यास बंदी घातलेली असताना रात्रीच्या वेळी बोअरवेलची गाडी गावात आणल्याबाबत विचारणा करणाऱ्या मंडप व्यावसायिकाला तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “बंदूक घेऊन येतो, गोळ्या घालून जिवे मारतो,” अशी गंभीर धमकी दिल्याची घटना बुधवारी (दि २९) जुलै रात्री घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC Police […]

अधिक वाचा..

शेजाऱ्यानेच रचला घरफोडीचा डाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला पर्दाफाश

शिक्रापूर (ओमकार भोरडे ): शेजारधर्माच्या नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना शिरूर तालुक्यात उघडकीस आली आहे. दशक्रिया विधीसाठी संपूर्ण कुटुंब घराबाहेर जाणार असल्याची माहिती घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच सराईत चोराला पुरविल्याने बंद घरावर डल्ला मारून तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले मात्र शिक्रापूर पोलिसांनी तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल, पॉवर बँकांसह १७,६०० रुपयांचा ऐवज लंपास

राज हॉटेलशेजारील ‘शिवराज मोबाईल रिपेअरिंग’ दुकानाचे पत्रे उचकटून चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : शिक्रापूर येथील राज हॉटेलशेजारी असलेल्या शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल फोन व पॉवर बँक असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात […]

अधिक वाचा..

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके यांनी घेतली भेट शिरूर दि.२९ ( अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी येथील ७५ वर्षीय केरबा बाबूराव खोरे यांच्या पंढरपूर वारीदरम्यान एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या मुलाखतीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आयुष्यभर दुःखाचे डोंगर पेलत एकाकी जीवन जगणाऱ्या या वृद्ध शेतकऱ्याची […]

अधिक वाचा..