तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि अॅक्टीव्हा जप्त: शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथे काळ्या रंगाच्या विनानंबर अॅक्टीव्हा गाडीवर थांबलेल्या दोन संशयित युवकांकडून शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि एक अॅक्टीव्हा असा एकूण १ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (दि. २९) ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ वाजता पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना […]

अधिक वाचा..

शिक्रापूरमध्ये पोलीस निरीक्षकांची तत्परता; रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीवर नियंत्रण

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील चाकण चौकात गणेशोत्सव, शनिवार-रविवारची सुट्टी आणि मराठा मोर्चामुळे दोन तीन दिवसांपासून ठप्प झालेली वाहतूक शनिवारी शिक्रापूर परिसरात शिगेला पोहोचली. पुणे–नगर महामार्गावर मालवाहतूक व प्रवासी वाहनांची प्रचंड कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले होते. या बिकट परिस्थितीत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी स्वतः मैदानात उतरत वाहतूक व्यवस्थापनाची […]

अधिक वाचा..
dilip-thorat-guruji

शिक्षक दिलीप थोरात यांना पालकांच्या वतीने इलेक्ट्रिक दुचाकी भेट!

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील शाळेतील इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत २२ विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक दिलीप मारुती थोरात, मुख्याध्यापक रामदास आनंदराव थोरात तसेच सर्व शिक्षकवृंदांचा पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना, मार्गदर्शक शिक्षकांना, मुख्याध्यापकांना व शिक्षकांना अक्षय धुमाळ […]

अधिक वाचा..
shubham thorat waghale

आपली माती क्रीडा प्रबोधिनीच्या शुभम थोरातला ७ लाखांची शिष्यवृत्ती…

​पुणे: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी शेठ काळेप्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग रणजीत देओल, महाराष्ट्र राज्य क्रीडायुक्त शितल तेली/ उगले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित कार्यक्रमात आपली माती क्रीडा प्रबोधिनीचा राष्ट्रीय खोखो खेळाडू शुभम थोरात याला […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्या विरोधात तब्बल नऊ गावांच्या ग्रामस्थांचे लेखी निवेदन

निवासस्थानी न राहणाऱ्या डॉक्टरच्या बदलीची केली मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ‘आरोग्य’ नावालाच शिल्लक राहिले असून हे केंद्र अक्षरशः मृत्यूचं घर बनले आहे. वैद्यकीय अधिकारी नेमलेले असूनही एक अधिकारी सरकारी निवासस्थानात न राहता बाहेर मजेत मौजमजा करतात. सकाळी काही तास ‘हजेरी’ लावतात आणि दुपारी केंद्र सोडून निघून जातात. त्यामुळे […]

अधिक वाचा..

Video; प्लॉटिंगसाठी जीव धोक्यात घालुन २२ के व्ही लाईटच्या पोलवर जाहिरातबाजी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात प्लॉटिंगचे प्रमाण वाढले असुन प्लॉटिंगच्या जाहिरातीसाठी भर पाऊसात २२ के व्ही विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या विजेच्या खांबाला लोखंडी शिडीचा वापर करत ‘वृंदावन सिटी’ या प्लॉटिंगच्या जाहिरातीचे फ्लेक्स लावण्यासाठी जीव धोक्यात घालत दोन कामगारांनी फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार करडे-कारेगाव रस्त्यावर आज (दि २९) रोजी दुपारी २:३० च्या […]

अधिक वाचा..

Video; ठेकेदाराचा अजब कारभार; भर पाऊसात करडे-कारेगाव रस्त्याची डागडुजी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) करडे-कारेगाव रस्त्याचे गेल्या सहा महिन्यांपुर्वी काम झाले होते. परंतु सहा महिन्यानंतर हा रस्ता उखडन्यास सुरुवात झाली असुन ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. आज (दि २९) रोजी दिवसभर पाऊस चालु होता. त्या भर पाऊसात ठेकेदाराने रस्त्याची डागडुजी चालु केली असल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त करत एवढया दिवस ठेकेदार काय झोपा काढत होता […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये भरधाव टेम्पोने शेतकऱ्याला उडवले; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमोणे (कुऱ्हाडवाडी) येथील रहिवासी शेतकरी हनुमंत साधु गरदडे (वय ३३) यांना भरधाव टेम्पोने धडक देऊन गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी टेम्पो क्रमांक एमएच १६ सीडी ८०८९ वरील अज्ञात चालकाविरुद्ध शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ही घटना दिनांक १८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६:३० च्या दरम्यान शिरुर […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनी पिकांची ई-पिक पाहणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुंग, उडिद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक आहे. ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC त दिवसाढवळ्या ऑफिसमधुन ९० हजार रुपयांची टूल्सबॅगची चोरी

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या ऑफिसमधून दिवसाढवळ्या तब्बल ९० हजार रुपयांची किमतीची टूल्सबॅग अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बबन नामदेव मिडगुले (वय ३७, रा. शिक्रापुर, वाबळेवाडी) यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी मिडगुले हे जागृती टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रोजेक्ट हेड […]

अधिक वाचा..