पिंपळे जगताप ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील भारतगॅस कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाने संबंधित रस्त्याचे प्रत्यक्ष काम हाती घेतले असुन त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये उद्योजक श्रीपाद जगताप यांच्या नेतृत्वाखाली चक्री उपोषण छेडण्यात आले होते. या आंदोलनाला जातेगाव […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये गणेशोत्सवानिमित्त २०० झाडांचे वाटप करत सीसीटीव्ही बसविण्याचा संकल्प

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल तसेच शिक्रापुर पोलीस स्टेशन यांनी केलेल्या आवाहनानुसार गावातील तसेच परिसरातील नागरिकांना २०० झाडांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच, उर्वरित वर्गणीचा उपयोग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरितच

बेट परीसरातील नागरिकांचा संताप शिगेला शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्र हे आजारपणाच्या, अपघाताच्या काळात लोकांना दिलासा देण्याऐवजी मृत्यूचे केंद्र ठरत चालले आहे. कारण या आरोग्य केंद्रावर नियुक्त असलेली वैद्यकीय अधिकारी फक्त नावालाच हजेरी लावून लगेच शिरूरला रवाना होते. दिवसभर रुग्णालय कर्मचार्यांच्या जीवावर रामभरोसे सुरू असते. कर्तव्यात कसूर, शिस्तभंग व कामचुकारपणा […]

अधिक वाचा..

पारगाव–पुणे एसटी सेवा पुन्हा सुरू; गणेगाव खालसा ग्रामस्थांकडून चालक–वाहकांचा सन्मान

शिरूर (ओमकार भोरडे): काही दिवसांपूर्वी थांबलेली पारगाव–मंगरूळ–जांबुत–मलठण–शिक्रापूर–वाघोली–पुणे ही एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिरूर आगारातून धावणारी ही गाडी आता टपालसेवाही नेणार असल्याने ती “टपाल गाडी” म्हणूनही ओळखली जाणार आहे, अशी माहिती चालक गणेश पलांडे व वाहक दत्तात्रय डोळस यांनी दिली. या गाडीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरी–धंद्यासाठी जाणाऱ्या कामगारांना तसेच […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात गौरीचे उत्साहात आगमन

शिरूर (अरुणकुमार मोटे): गणेशोत्सवात गौरी-गणपतींच्या आगमनाने शिरूर तालुक्यातील गावागावांत पुन्हा एकदा उत्साह, भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: महिलांच्या सहभागातून या उत्सवाला वेगळे पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले आहे. गौरीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे पूजन करण्याची प्रथा असून यासाठी परसरातील महिलांना विशेष निमंत्रण देण्यात येते. माहेरी आलेल्या गौरीला पारंपरिक साजशृंगार करून तिच्या सोबत […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे रक्तदान शिबिरात ६१ जणांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर (अरुणकुमार मोटे): रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या सामाजिक संदेशाला उजाळा देत सविंदणे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवारी (ता.३१) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर-आंबेगाव महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा व माजी सरपंच शुभांगी पडवळ यांच्या पुढाकारातून हे […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव महागणपती चरणी मराठा आरक्षणासाठी प्रार्थना

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिरात सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती स्वास्थ्याबरोबरच सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गणरायाच्या चरणी सामूहिक प्रार्थना अर्पण करण्यात आली. यावेळी परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसर […]

अधिक वाचा..

Video; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार-आमदार गप्प का…? रांजणगाव गणपतीत लागले फलक…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना, रांजणगाव गणपती येथे लागलेल्या फलकांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. रांजणगाव बसस्थानक परिसर व महागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मतदारसंघात आपल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला मिळाला सन्मान

शिरूर (अरुणकुमार मोटे): हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा दिन यंदा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मलठन येथे विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि क्रीडागणात जोशाचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने कबड्डी, खो-खो तसेच क्रीडांगण मापनाशी संबंधित प्रश्नमंजुषा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा जाहीर; उत्कृष्ट मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पारितोषिके

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला शासनाने ‘राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून, या पार्श्वभूमीवर तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विविध निकषांनुसार मंडळांची निवड करून त्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, शिरूर बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे गुणांकनासाठी कलांचे जतन […]

अधिक वाचा..