देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार बुधवारी रांजणगाव MIDC त येणार; काय आहे कारण….?

कारेगाव (तेजस फडके) देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत (Ranjangaon MIDC) येणार असुन येथील महाराष्ट्र इन्व्हारो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतुन सोडण्यात येणाऱ्या केमिकल युक्त दुषित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतीची पाहणी व शेतकऱ्यांची व्यथा समजुन घेण्यासाठी बुधवार (दि २३) रोजी सकाळी १० वाजता निमगाव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जुन्या वादातुन दाजीची मेहुण्याला बेदम मारहाण; गुन्हा दाखल 

शिक्रापुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे रस्त्याच्या कडेला उभा राहुन क्रिकेट मॅच बघणाऱ्या मेहुण्याला जुन्या वादातून त्याचा दाजी आणि त्याच्या तीन मित्रांनी बॅट व स्टंप ने बेदम मारहाण केल्याप्रकरणी मेहुण्याने शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन किरण बबनराव थिटे, राम भोकनळ, लखन भोकनळ, सत्यम खेडकर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

सौर पंप एजन्सींकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक!

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” अंतर्गत शेतकऱ्यांना वीजटंचाईवर उपाय म्हणून कमी खर्चात सौर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी प्रत्यक्षात या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा भ्रष्टाचार आणि पिळवणुकीचे प्रकार शिरूर तालुक्यात समोर येत आहेत. योजना लाभार्थ्यांसाठी असली तरी, ती काही ठराविक एजन्सी आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या एजंटांच्या फायद्याची ‘संधी’ ठरत असल्याचे […]

अधिक वाचा..

इचकेवाडीत जमीन वादातून हाणामारी; सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई (इचकेवाडी) येथे जमीन वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाबुराव सगाजी इचके, सगाजी कोंडाजी इचके, अनिता बाबुराव इचके आणि इतर पाच नातेवाईकांविरोधात गु.र.नं. 260/2025 अन्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 18 एप्रिल रोजी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..

कांद्याच्या आरणीवरून वाद विकोपाला; एका शेतकऱ्यावर सात जणांचा हल्ला

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शेजारील सात जणांनी हल्ला केल्याची गंभीर घटना 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.45 वाजता घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. 259/2025 अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बाबुराव […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांवर संकट! शिरूर तालुक्यात नदीपात्रातून दोन इलेक्ट्रीक मोटारी चोरीला

पोलिसांत गुन्हा दाखल, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रीक मोटारी चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे (संगमवाडी) येथील घोडनदी पात्रालगत अण्णापुर के.टी. बंधाऱ्याजवळून दोन शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 17 ते 18 एप्रिलदरम्यान घडली आहे.या प्रकरणी पोपट भाऊ खाडे (वय 65 वर्षे, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेताच्या वादातून राडा

एका कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शेताच्या वाटेच्या वादातून एकाच कुटुंबावर पाच जणांच्या टोळक्याने लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रांजणगाव सांडस येथे घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ही घटना 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. प्रशांत सुरेश रणदिवे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर येथील रिलायंन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करणारे ६ चोरटे गजाआड; गुन्हे शोध पथकाची कामगिरी

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत दि. ०४/०४/२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने रिलायन्स जिओ इंन्फोकॉम लिमीटेड या कंपनीच्या पत्र्याचे गोडाऊनची पाठीमागील भिंत फोडुन भिंतीला होल करून त्यानंतर त्या होलवाटे गोडाऊनमध्ये प्रवेश करून २,४६,७५०/- रू. किंमतीची ३५२५ मिटर कॉपर केबल, १२,५००/- रू. किंमतीचे ५ केबल कनेक्टर व ३,००,०००/- रू. किंमतीच्या १० बॅटऱ्या […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेचे ठेकेदार अडचणीत! म्हाडाच्या जमिनीवर मुरूम उत्खनन प्रकरण अंगलट 

तहसिलदारांनी तब्बल ८८.५० लाखांचा ठोठावला दंड  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. मौजे शिरूर, गट क्रमांक ११४३/ब मधील म्हाडाच्या मालकीच्या १ हेक्टर ६४ आर क्षेत्रावर तब्बल १५०० ब्रास मुरूमचे अनधिकृत उत्खनन शिरूर नगरपरिषदेचे घनकचरा ठेकेदार / निविदाधारक यांनीं केले आहे. ही माती शिरूर नगरपरिषदेच्या घनकचरा डेपोच्या कामासाठी […]

अधिक वाचा..

जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वारस नोंदणीसाठी विशेष मोहीम

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर (अरूणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि मा. जिल्हाधिकारी, पुणे व मा. उपविभागीय अधिकारी, शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात “जिवंत सातबारा मोहीम” राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मयत झालेल्या खातेदारांच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (दि. १ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत […]

अधिक वाचा..