पुणे जिल्हा परिषद आयोजित इस्रो-नासा या अभ्यास दौऱ्यासाठी परीक्षेचा निकाल वादात; गुणवंत विद्यार्थ्यांऐवजी ‘तालुका कोटा’नुसार निवड

शिरुर (अरुणकुमार मोटे) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे इस्रो (ISRO) आणि नासा (NASA) या नामवंत अंतराळ संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा ५ जुलै २०२५ रोजी पार पडली. निकाल १७ जुलै रोजी जाहीर झाला. मात्र निकालानंतर ‘गुणानुक्रमाने निवड’ न करता ‘तालुका कोट्यानुसार’ […]

अधिक वाचा..

शिरुर; नागपुर स्थित मुख्यमंत्र्यासाठी भाजपा मध्ये आस्था तर पुणे स्थित उपमुख्यमंत्र्यासाठी राष्ट्रवादीत अनास्था

शिरुर (तेजस फडके) काल (दि २२) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात कार्यकर्त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. शिरुर तालुक्यात भाजपाच्या रक्तदान शिबीर तर राष्ट्रवादीच्या वतीने आरोग्य शिबीर व वृक्षारोपण करण्यात आले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ज्या राजकीय पुढाऱ्यांना अजित पवारांनी वेगवेगळी पदे दिली. त्यांच्या गावात मात्र अजित […]

अधिक वाचा..

बेकरी सील करून चालणार नाही, बेकरी  चालक व स्वीट होमवर गुन्हा दाखल करा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शहरातील रामलिंग रोडवरील प्रसिद्ध ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ या स्वीट होम मधून विकत घेतलेल्या पावात आढळलेल्या घुशीच्या लेंडीच्या प्रकरणाने खळबळ उडवली असून, या प्रकरणात आता स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. खराब पाव विकणाऱ्या स्वीट होम वर कुठलीही कारवाई केली नसून पाव तयार करणारी बेकरी सील करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

मलठणच्या सावी ताठेचे राष्ट्रीय स्तरावर यश! सेबर तलवारबाजीमध्ये महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदकाची कमाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या तेराव्या मिनी आणि सातव्या चाइल्ड नॅशनल फेन्सिंग चॅम्पियनशिप 2025-26 मध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मलठण येथील सावी संतोष ताठे हिने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदक पटकावले. सावीने दहा वर्षाखालील सेबर प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना देशभरातील एकूण ३२ स्पर्धकांमध्ये आठव्या क्रमांकावर आपले स्थान […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पेट्रोल पंपात चोरी; चार कामगारांवर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथे निमोणे-गुनाट रोडवर असलेल्या परफेक्ट एच. पी. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या चार कामगारांनी मिळुन एकुण ९४ हजार ५२० रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत राजेश्री अनिल काळे (वय ४३) रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दि २१ जुलै २०२५ रोजी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विजय डिंबर यांना पंचायत समितीची उमेदवारी द्या…

मच्छीमार समाज आणि युवक वर्गाची एकमुखी मागणी  शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे निष्ठावान नेते विजय रामचंद्र डिंबर यांना आगामी पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थ व विशेषतः मच्छीमार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. विजय डिंबर यांनी NSUI पासून राजकीय वाटचालीला सुरुवात करत युवक […]

अधिक वाचा..

घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला; एका आरोपीचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध, तपासाला वेग

शिरूर (अरुणकुमार मोटे) मांडवगण फराटा परिसरातील अकरावा मैल येथे बुधवारी (ता. १६ जुलै) रात्रीच्या सुमारास घरात घुसून १९ वर्षीय तरुणावर झालेल्या गंभीर प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात शिरूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आरोपींपैकी एका हल्लेखोराचे स्केच प्रसिद्ध केले आहे. या स्केचच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये पावामध्ये घुशीची लेंडी आढळल्याचे प्रकरण: अन्न सुरक्षा विभागाने पाहणी करत केली बेकरी सील 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शहराच्या रामलिंग रोड परिसरातील ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ या सुप्रसिद्ध बेकरीतून विकत घेतलेल्या पावाच्या लादीत घुशीची घाणेरडी लेंडी आढळल्याने शिरूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अन्न सुरक्षेबाबतचा प्रशासकीय हलगर्जीपणा आणि बेकऱ्यांमधील अस्वच्छतेचे गंभीर वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे. ही धक्कादायक घटना (दि. २०) जुलै रोजी सतीष तागड यांच्याबाबतीत घडली. त्यांनी बेकरीतून दोन पावाच्या लाद्या […]

अधिक वाचा..

गुनाट येथील जुन्या पिढीतील चंपाबाई थोरात यांचे निधन 

शिंदोडी (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील गुनाट येथील रहिवासी व सर्वांमध्ये आपुलकीनं वागणाऱ्या चंपाबाई नामदेव थोरात (वय ९० वर्ष) यांचे दिनांक १५जुलै २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी आयुष्यभर साधं, सोज्वळ आणि कुटुंबवत्सल जीवन जगत समाजात आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर तसेच परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पती, दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा […]

अधिक वाचा..

गट व ‘गन’ जाहीर होताच मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू; आखाडात स्नेहभोजन की निवडणूक प्रचार?

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येऊ लागल्या असताना शिरूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापली राजकीय ताकद दाखवण्याचे रणशिंग फुंकले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आखाडात ‘स्नेहभोजन’, ‘स्नेहमेळावा’, ‘विचारमंथन’, ‘कार्यकर्ता संवाद’ अशा नावांखाली गावागावात होणाऱ्या भव्य कार्यक्रमांमधून प्रत्यक्षात राजकीय गटबाजी, शक्तिप्रदर्शन व मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील विविध […]

अधिक वाचा..