तलाठ्यांच्या मनमानी कारभाराने शिरूर तालुक्यातील नागरिक त्रस्त

ग्राम महसूल अधिकारी निवासी दाखवा आणि बक्षीस मिळवा… शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अनेक ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) सजाच्या ठिकाणी राहत नसून ते पुणे, वाघोली परिसरात राहत असल्याने वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे किंवा उशिरा येण्याने वारसनोंदी, खरेदीखताच्या नोंदी, ७/१२ उतारे आदी महत्त्वाच्या महसुली कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. यापैकी काही […]

अधिक वाचा..

माजी आमदार अशोकबापू पवार यांच्या विशेष प्रयत्नातून सातकरवाडी शाळेला शालेय साहित्यासाठी मदत

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या प्रयत्नातून पिडीसीसी बँके मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातकरवाडी शाळेस शालेय साहित्य भौतिक सुविधा करिता 15 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. शिरूर हवेलीचे कार्यसम्राट माजी आमदारांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी माजी आमदार यांच्या […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची उल्लेखनीय कारवाई, चोरीला गेलेले सोन्याचे दागिने केले महिलांच्या स्वाधीन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांतील आरोपींना अटक करून एकुण ४ लाख ६८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल (दि २४) जुन रोजी, मूळ मालकांना परत करण्यात आला असुन या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शिरुर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पहिल्या घटनेत दि. ११ मे […]

अधिक वाचा..

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला लावण्याच आमिष दाखवत परप्रांतीय तसेच विदर्भ, मराठवाडा येथील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची आर्थिक फसवणुक होत आहे. अशी अनेक प्रकरणे सध्या ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ कडे येत आहेत. शिरुर तालुक्यात रांजणगाव MIDC मध्ये अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या […]

अधिक वाचा..
pmpml-bus-driver

मनपा ते तळेगाव ढमढेरे PMPML बस चालकाने प्रवाशाला केली बेल्टने मारहाण…

शिक्रापूर : मनपा ते तळेगाव ढमढेरे या PMPML बसच्या चालकाने प्रवाशाला बेल्टने मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ घडली आहे. या मारहणीचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिक्रापूरमधील चाकण चौकात बस चालकाने बस थांबवून खाली उतरून प्रवाशाला बेल्टने मारहाण केली. यावेळी काही प्रवाशांनी चालक नशेत असल्याचा आरोप केला आहे. चालक हा बस चालवताना […]

अधिक वाचा..
karegaon-student

शिरूर! नरेश्वर वस्ती येथे शिक्षणाचा ‘गव्हाणे पॅटर्न’ राबवत घडवणार विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य…

कोरेगाव भीमा : “ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, आणि हे हक्क त्यांना मिळवून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य!” या विधायक दृष्टिकोनातून प्रेरित होत, कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल शहाजी गव्हाणे यांनी बॅग (दप्तर) व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांनी वह्या वाटप करत एक आदर्शवत शैक्षणिक मदतीचे काम […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरूर! ग्राहक सेवा केंद्राकडील एच.पी. गॅस पुरवठा ठप्प…

मांडवगण फराटा (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्राद्वारे चालवण्यात येणाऱ्या दुकानांचा गॅस पुरवठा बंद केल्यामुळे तालुक्यातील पूर्व भागातील दोन गावांमधील दोन सेवा केंद्राचा एचपी गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. येथील गॅस ग्राहकांना पाच ते सात किलोमीटर जाऊन गॅस आणण्याची वेळ आली आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारकडून सीएससी धारकांना ‘ग्राहक […]

अधिक वाचा..

Video; चिंचणी गावातील अवैध दारु धंदे बंद करा; महिलांचा यल्गार; रुपाली चाकणकारांना साकडे

शिंदोडी (तेजस फडके) चिचणी (ता. शिरुर) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री केली जात आहे. हि विक्री होत असल्यामुळे गावातील तरुणवर्ग दारुच्या आहारी जात असुन अनेक तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये वाद होऊन अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. गावातील अनेकजण दारु पिऊन महिलांना मारहाण करतात. त्यामुळे गावातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या […]

अधिक वाचा..

केंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल साकोरे यांची बिनविरोध निवड

पाबळ: शिरूर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मंगल अरुण साकोरे व उपसरपंच पदी कल्पना थिटे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी मंगल साकोरे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला. केंदूर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच व उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच […]

अधिक वाचा..

डॉ. प्रकाश उचाळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात शेतकरी, दुधउत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आमदार गावडे यांच्याकडून कार्याची प्रशंसा शिरूर (अरुणकुमार मोटे): “डॉ. प्रकाश उचाळे यांनी आपल्या सेवाकार्यातून केवळ पशुधनाचेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनातही आनंद फुलविला आहे. दुधउत्पादन वाढवण्याच्या दिशेने त्यांनी दिलेले योगदान खरोखरच अनुकरणीय आहे,” असे गौरवोद्गार शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले. कवठे येमाई (ता. शिरूर) येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश उचाळे यांच्या […]

अधिक वाचा..