शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मोटेवाडी गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या डाळिंबाच्या बागेतुन अज्ञात चोरट्यांनी अंदाजे दीड ते दोन टन डाळिंबाची चोरी केल्याचा अंदाज शेतकरी संदीप येलभर यांनी व्यक्त केला आहे. सुमारे आठ दिवसांपासुन हि चोरी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज (दि ८) जुलै संदीप येलभर पहाटे ३ ते ३:३० च्या दरम्यान शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेले असताना त्यांना डाळिंब बागेत काहीजण डाळिंबाची चोरी करताना दिसले. त्यानंतर येलभर यांनी आरडाओरडा केल्याने चोरांनी दुचाकी जाग्यावरच सोडुन पळ काढला. चोरट्यांनी डाळिंब तोडून काही गोण्यामध्ये भरुन ठेवले होते. याबाबत संदीप येलभर यांनी शिरुर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
शिंदोडी येथे ४ लाख ५० हजारांचा डाळिंब माल चोरीला; तालुक्यातील तिसरी घटना