शिरूर तालुक्यातील ३७ शाळांचा शंभर टक्के दहावी निकाल; एकूण निकाल ९७.२९%

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याने यंदाही शैक्षणिक क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी सिद्ध केली आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शिरूर तालुक्याचा एकूण निकाल ९७.२९ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील ३७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागून त्या शाळांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. यंदा ८२ शाळांमधून एकूण ६,७२४ विद्यार्थी परीक्षेला बसले […]

अधिक वाचा..

सणसवाडीची भाजी मंडई ठरतेय मृत्यूचा दुहेरी सापळा!

वाहतूक कोंडी, अपघात आणि अडथळ्यामुळे रुग्णवाहिकांच हाल; प्रशासन गप्प! शिरुर (अरुणकुमार मोटे): सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गालगत सुरू असलेली भाजीपाला मंडई सध्या जीवघेणा प्रश्न बनली आहे. मुख्य रस्त्यालगतच बेकायदेशीर पद्धतीने उभारण्यात आलेल्या भाजीपाला दुकानांमुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या वेळेस येथे प्रचंड गर्दी होते आणि या गर्दीमुळे […]

अधिक वाचा..

सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात दोन रानगवे दिसल्याने खळबळ

शिरूर (अरुणकुमारमोटे): शिरूर तालुक्यातील सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात शुक्रवारी (ता.९) दुपारनंतर दोन रानगवे दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे . मुंजाळवाडी येथील अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या एका शेतात हे गवे फिरताना नागरिकांनी पाहिले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या गव्यांचे चित्रीकरण देखील केले आहे. या घटनेनंतर कवठे येमाई चे माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून […]

अधिक वाचा..

सविंदणे येथील चार जवानांची निवृत्ती, गावाने केला अनोखा सन्मान

शिरूर (अरुणकुमार मोटे): देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावून मायभूमीत परतलेल्या सविंदणे (ता. शिरूर) येथील चार निवृत्त जवानांचा सन्मान सोहळा गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात अनोखा सन्मान करत पार पडला. सुभेदार मेजर संतोष नाथू पोकळे, मेजर दत्तात्रेय मारूती पडवळ, अनिल लक्ष्मण पडवळ आणि दीपक साहेबराव लंघे या निवृत्त जवानांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. […]

अधिक वाचा..

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला! शिरूर बसस्थानकावर महिलेच्या पर्समधून सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर एस.टी. बसस्थानकावर रविवार (दि .११) रोजी दुपारी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधून तब्बल 4 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये चढण्याच्या गडबडीत ही चोरी झाली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्रिमूर्ती नगर, बारामती येथे राहणाऱ्या रूपाली अनिल काळेल […]

अधिक वाचा..
zero-to-hero

शिरूर तालुक्यातील मान्यवरांच्या अनुभवावर ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ पुस्तक!

शिरूरः शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करत असलले्या मान्यवरांनी भरारी घेतली असून, मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. परंतु, या पदापर्यंत पोहचण्यापूर्वी अनेकांना बिकट परिस्थितीमधून जावे लागले आहे. अनेकांचा ‘झिरो टू हिरो’ हा प्रवास थक्क करणारा आहे. ईश्वरी प्रकाशन आणि www.shirurtaluka.comच्या वतीने ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ या पुस्तकामधून अनेकांचा जीवनपट मांडला जाणार आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळखला […]

अधिक वाचा..

मलठण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरकडून परिचारिकेला शिवीगाळ करत धमकी; डॉ.राजेश जाधव निलंबित

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता.शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेला धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी व कर्मचाऱ्यांशी उद्धट वागल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी परिचारिका विद्या गिरीगोसावी यांनी बाह्यरुग्ण विभागातील […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या हितासाठी खरीप हंगाम नियोजन बैठक उत्साहात पार; आमदार माऊली कटके यांचे मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेती विभागाने अधिक गतिशीलतेने काम करावे, असे आवाहन आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी केले. शिरूर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज सकाळी 10 वाजता खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक तालुका कृषी अधिकारी शिरूर व हवेली आणि पंचायत समिती शिरूर व हवेली […]

अधिक वाचा..

शिरुर; क्रिकेट स्पर्धेत बक्षिसे देण्याचे आश्वासन पण बक्षीसाची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या अनेक गावात क्रिकेटच्या स्पर्धेची रणधुमाळी चालु आहे. शिरुर तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणारे अनेक राजकीय पुढारी या क्रिकेट स्पर्धेसाठी रोख रक्कम किंवा इतर बक्षीसे जाहीर करत असतात. काहीजण ती बक्षिसे देतात. मात्र काहीजण बक्षीस जाहीर करुन नंतर ती बक्षिसे देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे आयोजक मात्र […]

अधिक वाचा..

पठ्यान आईला शब्द दिला…तुझ्यासाठी आता जिल्हा पातळीवरच पद आणणार अन शब्दच खरा केला…

शिंदोडी (तेजस फडके) सन २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या आईचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला. हा पराभव त्याच्यासहीत सगळ्यांनाच्याच मनाला चटका लाऊन गेला. पण भावानं आईला शब्द दिला. ‘आता गाव पातळीवर नाही लढायच…तुझ्यासाठी जिल्हा पातळीवरच पद आणणार’… अन पठ्यान दिलेला शब्दच खरा केला. सन २०२३ च्या राज्यसेवा परीक्षेत त्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) पदी […]

अधिक वाचा..