शिरुर तालुक्यात ६० हजारांची लाच घेतल्याने लाचलुचपत विभागाची ग्रामसेवक महिलेवर कारवाई

कारेगाव (तेजस फडके) गावातील पेवर ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणुन दहा हजार रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणुन पन्नास हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये लाच मागत ती रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याप्रकरणी एका महिला ग्रामसेविकेवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. शिरुर तालुक्यातील भांबर्डे येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असणाऱ्या […]

अधिक वाचा..

ऐन शालेय प्रवेशाच्या काळात ‘महा ऑनलाइन’ सर्व्हरमध्ये मोठ्या चुका

नागरीकांना व सेतू केंद्रचालकांना होतोय मनस्ताप  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रभर नागरी सुविधा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र मागील काही दिवसांपासून ‘महा ऑनलाइन’ (महा आयटी) प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या विविध सेवा पुरवठ्यात वारंवार अडथळे निर्माण होत आहे. १० एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन सर्व्हर सतत बंद पडत असल्याने सेवा देण्यात अडचणी […]

अधिक वाचा..
grampanchayat-karegaon

शिरुर; चार वर्षात ‘सरपंच’ फक्त ‘नामधारी’ ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या ‘महाशयां’ चीचं लुडबुड…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या कारेगाव येथील माजी महिला सरपंचाच्या पतीने कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील एका कंपनीत काम मिळविण्यासाठी स्वतःची पत्नी सरपंच असताना ग्रामपंचायतच्या लेटरपॅडचा वापर करत स्वतःच्या पत्नीच्या सहीने कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याचे पत्र संबंधित कंपनीला दिले. त्यानंतर कंपनीत काम मिळाल्यानंतर संबंधित कंपनीमुळे कसलेही प्रदूषण होत नसल्याबाबतचे दुसरे पत्र महाराष्ट्र प्रदूषण […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची अवैध दारू विरोधात धडक मोहीम; गावठी आणि विदेशी दारू जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे):  शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर अंकुश आणण्यासाठी सलग चार ठिकाणी धडक कारवाया करत गावठी हातभट्टी दारू व विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवायांमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. पहिली कारवाई मलठण येथे केली असून (दि. २३) एप्रिल रोजी मौजे मलठण परिसरात अवैध दारू […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात ओम साई क्रिकेट क्लबच्या वतीने पहिल्यांदाचं ‘शिवशंभो चषक २०२५’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गुरुवार (दि २४) रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत शिरुरसह श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघानी सहभाग घेतला आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बिबट्याचा हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील इनामगाव (नलगे मळा रोड, कौल वस्ती) येथे आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ८२) या वृद्ध महिलेला घराच्या पढवीत झोपलेले असताना बिबट्याने शिकार समजून फरफटत नेले आणि हल्ला करून ठार केले. ही घटना पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. सुरुवातीला घरासमोर असलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका शिक्षक पतसंस्था भ्रष्टाचाराच्या गर्तेत; संचालक मंडळ बरखास्त करण्याची नंदकिशोर पडवळ यांची मागणी

पतसंस्थेतील अनेक आर्थिक घोटाळ्यांचा आणि कारभारातील अपारदर्शकतेचा पर्दाफाश शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिक्षक सहकारी पतसंस्था ही एक विश्वासाची संस्था म्हणून ओळखली जात होती. मात्र गेल्या दोन पंचवार्षिकांमध्ये या संस्थेचा कारभार पूर्णतः बेजबाबदार, अपारदर्शक आणि भ्रष्टाचारग्रस्त झाला असल्याचा गंभीर आरोप माजी सभापती नंदकिशोर पडवळ यांनी सहाय्यक निबंधक शिरूर यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे . […]

अधिक वाचा..

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

कारेगाव (तेजस फडके) “रांजणगाव MIDC तील कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?” अशा आशयाचे वृत्त ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केल्यानंतर कारेगाव येथील एका माजी महिला सरपंचाच्या पतीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पत्नी सरपंच असल्याचा गैरफायदा घेत या महाशयांनी ग्रामपंचायतची अनेक कामे स्वतःचे मेहुणे तसेच त्यांच्या मित्रांना दिल्याचे एका ग्रामपंचायत सदस्याने नाव न […]

अधिक वाचा..
nimgaon-candel-march

पहेलगाम हल्ला! निमगाव म्हाळुंगीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च, रॅली…

शिक्रापूर: जम्मू -काश्मीर मधील पहेलगाम भागात निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निमगाव म्हाळुंगी मध्ये कॅण्डल मार्च रॅली काढून मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. निमगाव म्हाळुंगी मध्ये शिवराज्य प्रतिष्ठाण आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच बापूसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या भागात पर्यटकांवर जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागिरकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक…

रांजणगाव गणपती (सुनील जिते) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येत आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी बुधवार (दि २३) रोजी निमगाव भोगी परीसरात ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी डॉ कोल्हे यांनी दुषित पाण्याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीतुन सोडण्यात […]

अधिक वाचा..