शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई! पाच सराईत आरोपींना दोन वर्षांसाठी तडीपार

क्राईम शिरूर तालुका

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पूनम अहिरे, उपविभागीय दंडाधिकारी शिरूर तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक १४ ऑक्टोबर रोजी जारी केले आहेत.या आरोपींना संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द तसेच सोलापूर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.

शिक्रापूर पोलिसांच्या अभिलेखावर सतत शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या या आरोपींविरोधात कायद्याचा वेळीच प्रतिबंध होऊन कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांना निर्भयपणे जगता यावे या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईसाठी संदिप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधक कारवाई पथकाने प्रस्ताव तयार करून सादर केला होता.प्रस्तावावर सुनावणी घेतल्यानंतर पूनम अहिरे यांनी आरोपींना हद्दपार करण्याचे आदेश दिले होते.

१) गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर सणसवाडी, ता. शिरूर पुणे, पारनेर, श्रीगोंदा २ वर्षे

२) निखील विजय पलांडे मुखई, ता. शिरूर पुणे, सोलापूर, पारनेर, श्रीगोंदा २ वर्षे

३) बाबुलाल अरुण भुजबळ तळेगाव ढमढेरे पुणे, सोलापूर, पारनेर, श्रीगोंदा २ वर्षे

४) प्रसाद प्रल्हाद ढगे कोरेगाव भिमा पुणे, सोलापूर, पारनेर, श्रीगोंदा २ वर्षे

५) सागर सुनिल वर्षे करंदी, ता. शिरूर पुणे, सोलापूर, पारनेर, श्रीगोंदा २ वर्षे या आदेशानुसार सर्व आरोपींना निर्दिष्ट भागांतून हद्दपार करण्यात आले असून, या इसमांना प्रतिबंधीत भागात दिसल्यास नागरिकांनी तात्काळ शिक्रापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले आहे.

सदरची कारवाई संदिप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) रमेश चोपडे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे) आणि प्रशांत ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.ही कामगिरी अविनाश शिळीमकर (पोलीस निरीक्षक, स्था .गु.शा पुणे ग्रामीण), दिपरतन गायकवाड (पोलीस निरीक्षक, शिक्रापूर), पो.उ.नि. महेश डोंगरे, पो.उ.नि. जितेंद्र पानसरे, तसेच पोलीस हवालदार महेश बनकर,अमोल नलगे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, जयराज देवकर, शिवाजी चितारे, प्रतिक जगताप, नारायण वाळके, राम जाधव यांच्या पथकाने केली आहे.शिकापुर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत