वेश्यालयात ग्राहक म्हणून गेल्यानेच आरोपी ठरवता येणार नाही; इलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

गाझियाबाद : वेश्यालयात ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीवर केवळ पैसे देऊन लैंगिक सेवा घेतल्याच्या आधारावर अनैतिक व्यापार (निवारण) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ५ किंवा ७ अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा इलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. संबंधित व्यक्ती वेश्यालय चालवणे, त्याचे व्यवस्थापन करणे किंवा वेश्याव्यवसायातून व्यावसायिक शोषण करणे यात सहभागी असल्याचे ठोस […]

अधिक वाचा..

जुन्नरमध्ये चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश

मुंबई: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई […]

अधिक वाचा..

सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्याचा शिंदेंकडून तीव्र निषेध; आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड येथे झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आणि पंजाबच्या खासदार हरसिमरत कौर बादल […]

अधिक वाचा..

अहिल्यानगरमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुणे LCB जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. पुणे LCB ने अटक केलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मण संजय शिरसाट (वय ३२), देविदास संजय शिरसाट (वय २४), आदित्य भाऊसाहेब कणगरे (वय २१) आणि आकाश श्रावण चक्रनारायण (वय २०) यांच्यासह […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, करडे गावातील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अवघ्या ७२ तासांच्या आत ताब्यात घेतल्यानंतर शिरुर पोलिसांनी वेगळाच पॅटर्न राबविला. शिरुर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत आरोपींची शिरुर शहर आणि करडे गावातुन धिंड काढली. यावेळी पोलिसांच्या कारवाईची परिसरात मोठी चर्चा रंगली असून, ‘कायद्यात राहाल […]

अधिक वाचा..

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा शोध लागलेला नसल्याने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर […]

अधिक वाचा..

पिंपरखेड येथील विद्युतरोहित्र व केबल चोरीप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; प्रफुल्ल बोंबे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. २७) पहाटे सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घोडनदी काठावरील १०० एच.पी. क्षमतेचे विद्युतरोहित्र निकामी करून २५ हून अधिक शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरी केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे तीन […]

अधिक वाचा..

नटराजन यांची नोटीसच रद्द! राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्या, भाजपावर ‘सीटचोरी’चा आरोप

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपाने आणि निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ज्या नोटीसच्या आधारे नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आला होता, ती नोटीसच तेलंगणातील न्यायालयाने रद्द केल्याने आता राज्यसभा निवडणूक रद्द करून […]

अधिक वाचा..

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): सोशल मीडियावरून ओळख वाढवत एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि […]

अधिक वाचा..

कल्याण रेल्वे अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर चाकू व कटरचा धाक दाखवून अत्याचार झाल्याच्या संतापजनक घटनेनंतर शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याला भेट देत संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच म्हणतात की, ‘महिलांचा अधिकार म्हणजेच महिलांचा सन्मान!’ त्यांच्या याच भूमिकेनुसार राज्यातील महिला व […]

अधिक वाचा..