शिरुर (तेजस फडके) शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान ज्ञानदेव वाळुंज यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल ज्ञानदेव दुर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन आप्पा धायगुडे यांनी काम पाहिले.
शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पुर्वीचे अध्यक्ष बलभीम वाळुंज तसेच उपाध्यक्ष सावित्राबाई वाळुंज यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सोपान वाळुंज आणि विठ्ठल दुर्गे यांची निवड करण्यात आली.
यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष एकनाथ वांळुज, बलभीम वांळुज, सुनील वाळुंज, माजी उपाध्यक्ष एकनाथ शिंदे, सावित्राबाई वाळुंज, संचालक शिवाजी ओव्हाळ, स्वप्नील वांळुज, इद्रंभान ओव्हाळ, बाजीराव कोळपे, रावसाहेब वाळुंज, दत्तात्रय होले, बाळासाहेब गाडीलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरुरच्या पुर्व भागातील माजी सरपंचाच्या केकवर भावी आमदार म्हणुन उल्लेख; चर्चांना उधान
शिरुर तालुका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण; सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडे करोडोंची माया…?
पिंपळे जगताप येथील दशक्रियेत तापले शिरुर-हवेलीचे राजकारण, सांत्वनपर भाषणात एकमेकांना काढले चिमटे