लोणावळा: पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ लोणावळ्यात एका 23 वर्षीय स्थानिक तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून, या प्रकरणी 3 अज्ञात तरुणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लोणावळ्यासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमके काय घडले, जाणून घ्या…
पीडित तरुणी शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास कामावरून घरी पायी जात असताना, कारमधून आलेल्या 3 अज्ञातांनी तरुणीला एकटी जातांना पहिले, दरम्यान, 25 ते 30 वयोगटातील आरोपी नराधमांनी तरुणीला अडवले. तरुणीला पाहून आरोपींची नजर फिरली त्यांनी तिचे तोंड दाबून, हात बांधून तिला गाडीत जबरदस्तीने बसवले. त्यानंतर तिला मारहाण करून तिचा मोबाईलही काढून घेतला.
धावत्या गाडीत आणि निर्जन ठिकाणी अत्याचार
आरोपींनी तरुणी धावत्या गाडीत सामुहिक बलात्कार करण्यात आला, त्यानंतर, एका निर्जन ठिकाणी कार थांबवून तिच्यावर अनेकवेळेस अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत आरोपींनी आळीपाळीने हे क्रूर कृत्य केले आणि नंतर तिला नांगरगाव परिसरात सोडून आरोपींनी पळ काढला.
पोलिसांची कारवाई
पीडित तरुणीने घडला प्रकार घरी सांगितला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली, पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीनंतर पोलिसांनी 3 अज्ञात आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपासकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.