video of girl dancing in front of buffalo

Video: युवती आली अंगावर मग गायीने घेतले शिंगावर…

देश

नवी दिल्लीः गायीला चारा भरवणाऱ्या एका युवतीचा गंमतीशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवती गायीला गंमतीने चारा देते आणि तिथेच नाचू लागते. पण पुढच्याच सेकंदाला त्या गायीने मुलीला चांगलाच धडा शिकवला. गंमतशीर व्हिडिओ नेटकऱ्यांनीही पसंत केला असून, लाखो जणांनी पाहिला गेला आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, युवती बादलीत चारा घेऊन गायीच्या जवळ जाते. त्यानंतर तिथेच उभी राहून नाचू लागते. पण, गायीला ते आवडलं नाही. त्यानंतर गायीने नृत्य करणाऱ्या मुलीला इतका जोराने धक्का दिला की ती  पाठीमागे कोसळली. संबंधित व्हिडिओ पाहून नेटिझन्सला हसू आवरेनासे होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Psycho Bihari (@psycho_biharii2)

Video: बैलांनी लाल रंगाची कपडे घातलेल्या महिलेवर केला हल्ला…

Video: गाईने खाटिकाला दिली आयुष्यभराची शिक्षा…