तांदूळाची पेज पिण्याचे आरोग्यदायी फायदे…

आरोग्य

१) तांदळाच्या पेजेमध्ये मध मिसळून प्यायल्याने एनर्जी मिळते. थकवा दूर होतो. पेजेमध्ये ताक मिसळून प्यायल्याने बॉडीमधून पाण्याची कमतरता दूर होते. लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

२) तांदूळ शिजवून झाल्यावर जेव्हा आपण भात काढून घेतो तेव्हा त्यामधील पाणी फेकून न देता ते पाणी पिण्यासाठी वापरावे. हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळविण्याचा चांगला स्रोत आहे. जे कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) ने परिपूर्ण आहे. दररोज सकाळी हे पाणी प्या आणि आपली ऊर्जा वाढवा. ऊर्जा वाढविण्यासाठी हा सोपा उपाय आहे.

३) तांदळाच्या पेजेमध्ये काळे मीठ टाकून प्यायल्याने भूक वाढते. तांदळाचे पाणी फायबराने पुरेपूर असतात. हे आपल्या मेटाबॉलिझमला वाढविण्यात मदत करतात. पचन तंत्र सुधारुन चांगल्या जिवाणूंना सक्रिय करण्याचे काम करतात. जेणेकरुन आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही.

४) दही टाकून तांदळाची पेज प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा जुलाब लागल्यावर तांदळाचे पाणी देणे फायदेशीर असतं. त्रासाच्या सुरुवातीस तांदळाच्या पाण्याचे सेवन केल्याने आपण गंभीर दुष्परिणामांपासून वाचू शकता.

५) तांदळाच्या पेजेमध्ये तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढवण्यास मदत मिळते. उच्च रक्तदाब नियंत्रण करण्यासाठीही तांदळाची पेज फायदेशीर असते. तांदळामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे याचा फायदा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास होतो. व्हायरल इन्फेक्शन किंवा ताप आला असल्यास तांदळाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होत नाही आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत राहणार. जेणे करून आपल्याला लवकर बरे होण्यास मदत मिळेल.

६) शरीरात पाण्याची कमी डिहायड्रेशन (निर्जलीकरण) च्या रूपात होते. विशेष करून हा त्रास उन्हाळ्यात जाणवतो. तांदळाचे पाणी आपल्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेला संतुलित करतं. तांदळाची पेज आणि गूळ एकत्रित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते. पेजेमध्ये दूध आणि साखर टाकून प्यायल्याने हाडे मजबूत होतात. केळे आणि तांदळाची पेज एकत्र करुन प्यायल्याने डायरियाचा प्रॉब्लेम दूर होतो.

७) तांदळाच्या पेजेमध्ये मीठ, धने आणि जिरे, हिंग मिसळून प्यायल्यास डायजेशन सुधारते. तांदळाचे पाणी कापसाच्या मदतीने चेहऱ्याला लावल्यास चेहरा तुकतुकीत होतो. त्यामुळे त्वचेची चमक वाढवण्यास मदत होते. ह्या पाण्यामध्ये केस आणि त्वचा यांच्या आरोग्याकरीता आवश्यक प्रथिने, ट्रायग्लिसराइड्स, लिपीड्स, कर्बोदके , फायटीक अॅसिड, इनोसिटोल, इत्यादी तत्वे आहेत. याच्या वापराने केस चमकदार आणि दाट होतात. त्वचेवरील अॅक्ने कमी होऊन उन्हामुळे त्वचेचे नुकसान होत नाही. ह्या पाण्याच्या वापरामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेचा पोत देखील सुधारतो.

८) तांदळाची पेज केसांकरता एक उत्तम टाँनिक आहे. पेजेच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो. केस रेशमी, चमकदार आणि मजबूत होतात. रुक्षता निघून जाते. तसेच दुतोंडी केसांची समस्या दूर होते. कारण यात मुबलक विटामिन, मिनरल असतात. केस मुलायम करायचे असल्यास पेजेत लवेंन्डर तेल टाकून त्या पाण्याने केस धुवावेत. या पाण्याने केस धुतल्यास व्हिटॅमिन आणि मिनरल्सच्या मदतीने केस आणखी मजबूत आणि सुंदर होतात.

९) भातामध्ये ओरिजेनॉल नावाचे तत्त्व आढळते. हे तत्त्व त्वचेला सूर्याच्या यूव्ही किरणांपासून वाचवण्यासाठी मदत करते. भाताच्या पाण्यात हिलिंगचे गुणधर्म असतात. त्यामुळे, छोट्या-मोठ्या संक्रमणापासून (इन्फेक्शन) तुम्ही दूर राहता. नियमितपणे पेज पिणार्याना स्तनाचा, गर्भपिशवी चा कँन्सरचा धोका टळतो. चेहऱ्यावर पडलेले डाग पिग्मेंटेशन या समस्या नियमितपणे पेज लावून हलके माँलीश केल्यास कमी होतात चेहऱ्यावर ग्लो येतो काढताना कापसाने चेहरा पुसावा. सहाव्या महीन्या नंतर बाळाला पेज व कडधान्य डाळी मिक्स करून देत गेल्यास बाळ कुठल्याही आजाराला बळी पडत नाही.

१०) दुसरा महीना लागल्यावर गर्भवती महीलांनी पेज पिणे फायदेशीर आहे. महीलांचा व्हाईट डिसचार्ज या विकारात भाताची पेज खूप औषधी आहे. तांदळाच्या पेजेमध्ये गुळ घालून प्यायल्याने लघवी साफ होते. नियमितपणे घेतल्यास स्त्रियाच्या पाळी संबंधित तक्रारी कमी होतात. हिमोग्लोबिन मध्ये वाढ होते अशक्तपणा कमी होतो.

थोडा भाजलेला तांदूळ व मूग समप्रमानात घ्यावे. त्यात चौदापट पाणी घेऊन उकडावे. शिजवताना त्यात हिंग, सेंधव, धने, सुंठ, मिरे, पिंपळीची पूड टाकावी. शिजवताना वाफ बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. या प्रमाणे तयार झालेल्या पेजेला ‘अष्टगुण मंड’ असे म्हणतात. ही पेज ज्वरनाशक असते ती रक्तवर्धक व अग्नीप्रदीप्त करणारी आहे. प्रामुख्याने आजारातून उठलेल्या अशक्त लोकांसाठी ती बलप्रद व आरोग्यकारक आहे. अशी ही आरोग्यदायी पेज आपण सकाळी पिणे सुरु करुयात. या पेजेसाठी शक्यतो हातसडीचा तांदूळ, पाँलीश न केलेला तांदूळ, ब्राऊन राईस, रेशनचा तांदूळ याचा वापर करा.

(सोशल मीडियावरून साभार)