शिरूर तालुक्यातील ३७ शाळांचा शंभर टक्के दहावी निकाल; एकूण निकाल ९७.२९%

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याने यंदाही शैक्षणिक क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी सिद्ध केली आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शिरूर तालुक्याचा एकूण निकाल ९७.२९ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील ३७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागून त्या शाळांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे.

यंदा ८२ शाळांमधून एकूण ६,७२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ६,५४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्हा परिषदेपासून खासगी इंग्लिश माध्यमाच्या शाळांपर्यंत सर्व स्तरांवर उत्कृष्ट निकालाची नोंद झाली आहे.

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची यादी

श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे, श्री संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कूल मुखई, श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे, न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव, श्री नागेश्वर विद्यालय निमोणे, न्यू इंग्लिश स्कूल धामारी, पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी, श्री गुरुनाथ विद्यालय वडनेर, न्यू इंग्लिश स्कूल अण्णापूर, श्री कालिका माता विद्यालय वाघाळे, अभिनव विद्यालय सरदवाडी, तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी, कै. के. पी. गदादे विद्यालय तांदळी, न्यू इंग्लिश स्कूल उरळगाव, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू बुद्रुक, छत्रपती संभाजीराजे विद्यालय जातेगाव बुद्रुक, जय मल्हार विद्यालय चिंचोली मोराची, श्री भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा, श्री शरदचंद्र पवार विद्यालय चिंचणी, एकता विद्यालय करंजावणे, रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर, पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय बाभूळसर बुद्रुक, फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोरेगाव भीमा, कै. रामराव गेनुजी पलांडे आश्रमशाळा मुखई, श्री पद्ममनी इंग्लिश स्कूल पाबळ, विजयमाला विद्यामंदिर शिरूर, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर, आर.एम.डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल कोंढापुरी, बालाजी माध्यमिक विद्यालय शिरूर, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव गणपती, अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल शिक्रापूर, अक्षरधन गुरुकुल स्कूल रांजणगाव गणपती, अक्षरधन गुरुकुल स्कूल कारेगाव, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव, ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर, ज्ञानवर्धिनी विद्यालय तळेगाव ढमढेरे, डी.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर.

इतर शाळांचा उल्लेखनीय निकाल (९०% पेक्षा जास्त)

विद्याधाम प्रशाला शिरूर – ९९.७८%

समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे – ९९.२५%

शंकरराव डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे – ९९.३३%

विद्या विकास मंदिर करंदी – ९९.०३%

दत्त विद्यालय पिंपरखेड – ९८.८०%

माध्यमिक विद्यालय सणसवाडी – ९८.३७%

कालभैरवनाथ विद्यालय कोयाळी – ९८.२१%

महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे – ९७.९१%

विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई – ९७.८४%

न्यू इंग्लिश स्कूल कवठे येमाई – ९७.८२%

श्रीमती बबईताई टाकळकर आश्रम शाळा – ९७.२९%

सौ. हिराबाई गायकवाड विद्यालय कासारी – ९७.२२%

श्री सद्गुरू कृपा विद्यालय नागरगाव – ९७.२२%

Aन्यू इंग्लिश स्कूल शिरूर – ९७.६९%

जय मल्हार स्कूल जांबुत – ९७.७६%

आदर्श विद्यालय वरुडे – ९६.५५%

जीवन विकास विद्यालय शिरूर – ९६.९६%

आयेशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर – ९०%

दत्त विद्यालय गुनाट – ७६.६६% (सर्वात कमी निकाल)

शिरूर तालुक्यातील शाळांनी यंदा उत्कृष्ट निकाल देत शैक्षणिकदृष्ट्या आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सर्व शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक णि विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे .