शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर येथुन कांदामाल रावल ट्रेडिंग कंपनी गुडगाव ,हरियाना राज्य या ठिकाणी पोहोच करण्याकरता दिला असता तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा ट्रक मालक, ड्रायव्हरने अपहार करुन मच्छिंद्र रोडे यांची तब्बल आठ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत सविस्तर हकीगत अशी की,भांबर्डे (ता.शिरुर) येथील कांदा व्यापारी मच्छिंद्र लक्ष्मण रोडे (वय ४५ ) व्यवसाय-बजरंग ट्रेडिंग कंपनी कांदा मार्केट शिरुर यांनी ४ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिरुर येथील कांदा मार्केट येथुन हरियाना गुड्स कॅरीयर्स सावरगाव, येवला जि. नाशिक येथील पवनकुमार शर्मा यांनी पाठविलेली चालक इसाक खान (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांना विश्वासाने भरलेल्या कांदयाच्या ४७६ पिशव्या २५४९५ कीग्रॅ वजनाचा ८ लाख २३ हजार २२४ रुपयांचा माल रावल ट्रेडिंग कंपनी गुडगाव व हरियाना राज्य या ठिकाणी पोहोच करण्याकरता दिला असता.
तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा अपहार करुन ट्रकचालकाने रोडे यांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत पवनकुमार शर्मा व चालक इसाक खान (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांच्या विरुध्द शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जगताप हे करीत आहेत.
शिरुर तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट; खोदकामाचा अंदाज न आल्याने पिकअप पलटी
पिंपळे जगताप येथील दशक्रियेत तापले शिरुर-हवेलीचे राजकारण, सांत्वनपर भाषणात एकमेकांना काढले चिमटे
शिरुर तालुका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण; सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडे करोडोंची माया…?