शिरूर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्टॅन्ड व शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल गहाळ झाल्याचे अनेक अर्ज दाखल झालेले आहेत. सदरचे गहाळ झालेले मोबाईल फोन हे ट्रेस करून पुन्हा नागरिकांना परत करण्या बाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिलेले होते.
शिरूर पोलीस स्टेशनला गहाळ झालेले मोबाईल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे यांनी ट्रेसिंगला लावुन गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषन करून शोध घेण्याचे काम सुरू केले होते. बहुतांश नागरिक हे एकदा गहाळ झालेल्या मोबाईल फोन परत मिळण्याची आशा सोडुन देतात. मागील चार महीन्यात तब्बल १५,२४,५००/-रूपये किंमतीचे एकुण ५५ मोबाईल फोन ट्रेसिंग करून कनार्टक व महाराष्ट्र राज्यामधील विवीध जिल्हयांमधुन परत मिळवण्यात शिरूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकास यश मिळाले आहे. कनार्टक राज्यामधील मोबाईल फोन शोधुन काढतेवेळी हवेरी पोलीस स्टेशन कर्नाटक येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार हनुमंता जनागेरी यांनी मदत केली आहे.
हे शोधुन काढण्यात आलेले ५५ मोबाईल फोन हे आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक
संदेश केंजळे यांच्या हस्ते मुळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. मुळ मालकांना हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे व गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले असुन नागरीकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. सन २०२५ या वर्षामध्ये शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आतापर्यंत गहाळ झालेले १२५ मोबाईल फोन शोधुन मुळ मालकांचे स्वाधीन केलेले आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक संदिप गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक श्संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकामधील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, पवन तायडे, निखील रावडे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड यांचे पोलीस पथकाने केली आहे.
हरवलेला मोबाईल पुन्हा मिळणे जवळपास अशक्य मानले जाते. मात्र शिरूर पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या सेवाभाव व तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.