श्रीगोंदा तालुक्यात प्रेमास नकार देणाऱ्या मुलीच्या भावाचा केला खून

मुख्य बातम्या

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून एका मुलीच्या प्रेमात पडलेल्या एका मुलाला मुलीने नकार दिल्याचा राग मनात धरुन त्या मुलीला धडा शिकविण्यासाठी तिच्या भावाला दारु पाजुन मित्राच्या मदतीने मोहरवाडी शिवारात कुकडी कॅनॉलमध्ये फेकुन दिल्याची धक्कादायक घटना घडली असुन विश्वनाथ उर्फ सुशांत सोपान भापकर (वय २८) रा. भापकरवाडी कोळगाव आणि त्याचा मित्र गौरव गोरक्ष साके रा.साकेवाडी कोळगाव दोन्ही आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळ्या असून अजून या गुह्यात अजुन कोणाचा सहभाग आहे कां याचाही तपास पोलीस करत आहेत.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

याबाबत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे सुशांत एका मुलीच्या प्रेमात पडला होता. परंतु त्या मुलीने सुशांतच्या प्रेमास नकार दिला त्यामुळे चिडलेल्या सुशांतने या मुलीला धडा शिकविण्यासाठी आपला मित्र गौरव याच्या मदतीने त्या मुलीच्या भावाला आधी भरपुर दारु पाजली आणि दि 14 जानेवारी 2022 रोजी मोहरवाडी शिवारात कुकडी कॅनॉल मध्ये फेकुन दिले. या कामात मदत करण्यासाठी गौरव साके याने सुशांत भापकर याच्याकडुन पन्नास हजार रुपये घेतल्याचे तपासादरम्यान सांगितले. सुशांत भापकर हा यापूर्वीही अनेक गुन्ह्यात आरोपी असुन बेलवंडी, श्रीगोंदा तसेच अहमदनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई अहमदनगरचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, गणेश इंगळे, मनोहर शेजवळ, विष्णु घोडेचोर, भाऊसाहेब काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण, बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, संदीप पवार, पोलीस नाईक सुरेश माळी, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, भिमराज खसे, राहुल सोळुंके, दिपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र घुगांसे, मच्छिद्र बड़े, जालींदर माने, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, चंद्रकांत कुसळकर, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर, अर्जुन बडे आणि भरत बुधवंत यांच्या विशेष पथकाची नेमणुक करुन बेपत्ता इसमाचा शोध घेऊन सदरची कारवाई केली आहे.