कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काही स्थानिक ठेकेदार कंपनीच्या कँटीन मधला राडारोडा मोकळ्या मैदानात टाकत असुन त्यामुळे प्रचंड मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. करडे येथील एक ठेकेदार हा उद्योग करत असुन याबाबतचे सर्व पुरावे ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या हाती लागले आहेत.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस कंपनीतुन उचलेला अनावश्यक कचरा, कँटीनचा राडारोडा तसेच इतर स्क्रॅपची विल्हेवाट लावण्यासाठी ठेके दिले जातात. काही स्थानिक ठेकेदार कंपनीकडुन या अनावश्यक कचरा, कँटीनचा राडारोडा तसेच इतर स्क्रॅपची विल्हेवाट लावण्याचे ठेके घेतात. त्याचे त्यांना लाखों रुपये मिळतात. परंतु कंपनीच्या बाहेर कचरा, कँटीनचा राडारोडा, स्क्रॅप आणल्यानंतर हे ठेकेदार त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता तो राडारोडा बिनधास्तपणे रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेत टाकत आहेत.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष…?
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यानी अनावश्यक कचरा, कँटीनचा राडारोडा तसेच इतर स्क्रॅपची विल्हेवाट लावण्याचे विविध ठेकेदारांना ठेके दिलेले आहेत. परंतु हे ठेकेदार कुठलीही प्रक्रिया न करता स्क्रॅप दिवसा किंवा रात्री पेटवून देतात. तसेच अनेक ठेकेदार कँटीनचा राडारोडा मोकळ्या मैदानात टाकत असुन निसर्गाची हानी करत आहेत. परंतु याकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.
(क्रमशः)
शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?
शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात पती-पत्नीची एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद