बालगंधर्व रंग मंदिरात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मंगेश गावडे यांना हा पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमास डॉ.सि.टी.कुंजीर, डॉ. श्रीमंत कोकाटे, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, अॅड श्रीकांत शिरोळ, डॉ.पी.ए.इनामदार, सरदार रविदादा ढमढरे,डॉ.सारिका रामशेठ साकोरे, दिपकभाऊ साकोरे, किशोर गाडेकर,उमेश साकोरे, अभिजीत साकोरे, महेश गावडे, भाऊसाहेब थिटे, राहुल भगत, विजयराव थिटे,अक्षय साकोरे, विद्या थिटे, कमल कुंजीर गीतांजली गावडे, संगीता गावडे तसेच महात्मा फुले इतिहास अकादमी, गिरीप्रेमी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी भावी शिक्षक व त्यांची कर्तव्य आणि जबाबदारी यावर सविस्तर भाष्य केले. महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन असून तो साजरा केला पाहिजे, असे मतही याप्रसंगी मांडले.

शिरुर तालुक्याचे माजी सभापती सुभाषराव उमाप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंकरदादा जांभळकर शिरुरच्या उपसभापती सविता पऱ्हाड, माजी सरपंच सुवर्णा थिटे, उद्योगपती राम थिटे व जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल गावडे सरांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बांडे व प्रा.औदुंबर लोंढे यांनी केले.