दोन कारच्या धडकेत एक कार उलटली; दोन्ही गाडीतले प्रवासी सुखरूप

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर वारंवार लहान मोठे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवार (दि 16) रोजी सायंकाळच्या सुमारास दोन कारची सामोरा समोर धडक होऊन एक कार रस्त्यावरच उलटल्याची घटना घडली मात्र सुदैवाने दोन्ही कार मधील प्रवाशी बचावले आहेत.

शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने एम एच १६ सि क्यू ९९५९ हि ईर्टीगा कार शिक्रापूर कडुन चाकणच्या दिशेने जात असताना समोरून चाकणकडुन शिक्रापूरला जाणाऱ्या वेगणार कार क्रं एम एच १४ डी एन ६२७९ हि कार कार जात असताना जातेगाव फाटा नजीक दोन्ही कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला, यावेळी जोरात झालेल्या धडकेत ईर्टीगा कार रस्त्यावरच उलटली. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, निखील रावडे यांसह आदींनी घटनास्थळी जात वाहतूककोंडी सुरळीत करुन घेतली, दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनातील प्रवाशी किरकोळ जखमी झाले तर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र दोन्ही वाहनातील प्रवाशी सुदैवाने बचावले आहेत.