Video : शिरुर तालुक्यात ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) करडे गावातुन निमोणेकडे दुचाकीवरुन निघालेल्या ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीला लंघेवाडी येथे दुपारच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक बसली. त्यानंतर ट्रॅक्टर थेट अंगावरुनचं गेल्याने कैलास मारुती गायकवाड (वय ६०, रा. निमोणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

या धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की त्यामुळे आसपासचा परिसर हादरुन गेला. अपघातानंतर गायकवाड रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक/अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या गायकवाड यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या भीषण अपघातामुळे करडे-लंघेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन संघाच्या रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाच्या ताब्यात दिला. याबाबत शिरुर पोलिस पुढील अधिक तपास करत आहेत.