शिरुर मध्ये पिस्तुल मधुन फायरींग करणाऱ्या आरोपीना बारा तासाच्या आत अटक

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पिस्तुल मधुन फायरींग करत दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील तीन आरोपीना गुन्हा घडल्यापासुन बारा तासाच्या आत शिरुर पोलिसांनी अटक करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

 

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 13 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:35 ते 11:50 च्या दरम्यान शिरुर गावच्या हददीत आर. के. हॉटेल समोर पुणे-अहमदनगर महामार्गावर वैभव भोईनल्लु याच्यासोबत असलेल्या जुन्या वादाच्या रागातुन अरबाज शेख याने त्याचा भाऊ आदीत्य भोईनल्लु याला जीवे मारण्याच्या उददेशाने पिस्तुल मधुन गोळी झाडली त्यात तो सुदैवाने बचावला.

 

त्यांनतर शिरुर येथील कामाठीपुरा येथे हनुमान मंदीराजवळ आदित्य बसलेला असताना 1) आशितोष काळे, २) अरबाज शेख, ३) पप्पु राजापुरे, ४) अरबाज खान, ५) प्रविण तुबाकी, ६) प्रकाश गायकवाड, ७) शुभम गाढवे, ८) कुणाल म्हस्के सर्व रा. शिरुर या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवुन आदित्यला शिवीगाळ दमदाटी केली. तसेच आशितोष काळे याने त्याच्याकडील पिस्तुल मधुन आदित्य व त्याचे मित्र तेथुन पळून जात असताना पुन्हा पिस्तुल मधुन आदित्यवर गोळी झाडली परंतु त्यावेळी आदित्य पळुन गेल्याने बचावला.

 

त्यानंतर शिरुर पोलिस ठाण्यात आदीत्य नितीन भोईनल्लु (वय २१) रा. हनुमान मंदीराशेजारी, कामाठीपुरा, शिरुर ता. शिरुर जि. पुणे याने तक्रार दाखल केली. त्यानंतर शिरुर पोलिसांनी यातील आरोपीत १) आशितोष मिलींद काळे (वय २४), २) अरबाज रहीम शेख (वय २३), ३) प्रकाश विलास गायकवाड (वय २०) या तिघांना वेगवेगळे पथक तयार करुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्या मदतीने संयुक्तरित्या तपास करत १२ तासाच्या आत शिताफीने त्यांना अटक केली आहे.

 

आरोपी आशितोष मिलींद काळे याच्या विरुध्द यापुर्वी 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी अरबाज रहीम शेख याच्याविरुध्द यापुर्वी 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीहे रेकार्ड वरील आरोपी असल्याने ते सतत पोलीसांना हलुकावणी देत होते त्यांनी पिस्तुल सारखे हत्यार वापरुन गुन्हा केलेला असल्याने पोलीसांनी शिताफीने त्यांना अटक केली असुन आरोपीना शिरुर न्यायालयात हजर केले असता. आरोपीना 17 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आलेली आहे. आरोपी अरबाज रहीम शेख याच्याकडुन गुन्हा करताना वापरलेले एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस असा एकुण २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल तपासात हस्तगत करण्यात आलेला आहे.

 

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घटटे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, संदीप यादव, पोलीस उपनिक्षक अभिजीत पवार, सुनिल उगले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, गणेश देशमाने, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, बबलु नागरगोजे, राजु मोमीन, पोलिस नाईक प्रताप टेंगले, पोलिस अंमलदार विनोद काळे, सचिन भोई, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, गणेश पालवे, अक्षय कळमकर या टिमने केलेली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करीत आहेत.