रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर दोन महिला रस्त्याच्या कडेला उभ्या असताना चारचाकी गाडीची धडक बसल्याने एका बेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असुन याबाबत मेघा राजाराम फंड, (वय 40) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. या अपघातानंतर वाहनचालक महेश वसंत वाळके (रा. बाभुळसर खुर्द, ता.शिरुर, जि. पुणे) हा पळुन गेला आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या (Shirur Shikshan Prasarak Mandal) कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापकपद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केल्याने त्याचा वारंवार मानसिक छळ करत आर्थिक लाभापासून वंचित ठेवुन, दबाव व दमदाटी करुन कोऱ्या दस्तऐवजावर सह्या घेऊन सर्वासमक्ष जातीयवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष नंदकुमार निकम यांच्यासह संस्था सचिव प्रकाश बोरा, शाळा […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात…? पोलिस ‘सिंघमगिरी’ दाखवणार का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या 20 ते 25 वर्षात मोठया प्रमाणात कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर, रांजणगाव, कारेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी राहिल्याने जमिनीचे भाव गगनाला भिडले. जमिनीच्या खरेदी-विक्रीतुन तसेच औद्योगिक वसाहतीमधुन वेगवेगळ्या कामांच्या ठेक्यातुन मिळणारा बेसुमार पैसा आणि त्या पैशाच्या हव्यासापोटी निर्माण झालेला जीवघेणा संघर्ष यातून शिरुर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था […]

अधिक वाचा..

शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरालगत घोड नदीपात्रात रस्सीने बांधलेल्या अज्ञात तरुणाच्या खूनाचा उलगडा करुन आरोपींना अटक करण्यात शिरुर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले आहे. कृष्णा गोकुळ विघ्ने (वय ३२ वर्ष), रा. आनंदगाव, ता. शिरुर कासार, जि. बीड असे खून झालेल्याचे व्यक्तीचे नाव असुन याप्रकरणी तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. मयत कृष्णा गोकूळ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जुन्या वादातून एकास मारहाण; उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जुन्या वादातून दोन जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत आधी शिरुर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा (दि 14) रोजी मृत्यू झाला असुन याप्रकरणी संतोष रभाजी मोहीते आणि राहुल रभाजी मोहीते दोघे (रा.चव्हाणवाडी, […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीसांची धडाकेबाज कारवाई 3 गावठी बनावटीच्या पिस्तुलासह 10 जिवंत काडतूस जप्त

शिरुर (तेजस फडके) मध्यप्रदेश येथुन गावठी पिस्तूल घेऊन आलेल्या आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे शिरुर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडुन 1 गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 4 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपुर्वी रांजणगाव MIDC पोलिसांनी 8 गावठी पिस्तूलसह आरोपीला अटक केली होती. त्यामुळे शिरुर तालुक्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला तीन वर्षे कारावासाची शिक्षा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथे सन 2018 ते सन 2021 या दरम्यान श्री मोरया हॉस्पिटल, या नावाने मेहमुद फारुख शेख (रा. पिर बु-हाणपुर, ता.जि. नांदेड) याने डॉ. महेश पाटील या बनावट नावाने “श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ICU” हे चालवुन त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटवरती औषोधोपचार केले होते. कोवीड काळामध्ये त्याने औषोधोपचार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला रांजणगाव पोलीसांनी केली चार तासात अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथे भाड्याने राहणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरुन खून केला. त्यानंतर तो फरार झाला होता. आरोपी पळुन जाण्याच्या तयारीत असताना रांजणगाव MIDC पोलिसांनी त्याला चार तासात तात्काळ अटक केली आहे. अशोक भिमराव रंधवे (वय 50) रा. नेवासाफाटा ता.नेवासा जि. अहमदनगर असे अटक केलेल्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी फोनवरुन मालाची ऑर्डर देवुन फसवणुक करणा-या महाठकाचा केला फर्दाफाश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फसवणुकीची वेगवेगळी उदाहरणे समोर येत असुन” जस्ट डायल” वरती फोन करून वेगवेगळ्या परिसरातील नामांकित बँटरी, कपडे, सिलाई मशिन, पेंड विक्रेते, तेल विक्रेते यांचे नंबर प्राप्त करून त्यावरून संबंधित दुकानदारांना फोन करुन मी दानशुर मारवाडी असुन मला अनाथ आश्रम, वृध्दाआश्रम यांना कपडे, बॅटरी, सिलाई मशिन, तेलाचे डब्बे असे दानधर्मासाठी पाहिजे आहेत. […]

अधिक वाचा..

कानून के हाथ बहोत लंबे होते है…ना FIR ना पुरावा… तरीही रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव येथे एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोक्याला आतून जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर रांजणगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मयताच्या तपासावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस करत आरोपीला ठोकल्या बेड्या […]

अधिक वाचा..