भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी…

क्राईम मुख्य बातम्या

वाघोली (प्रतिनिधी) लोणीकंद-थेऊर रस्त्यावर केसनंद हद्दीत जोगेश्वरी माता मंदिराच्या जवळ मालवाहू कंटेनर आणि इको कार गाडीचा भीषण अपघात झाला असुन या अपघातात इको गाडीचा चकनाचुर झाला असून दोन जण अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असुन पाच जण जखमी आहेत. लोणीकंद पोलीस व स्थानिक नागरिकांनी एक तास अथक प्रयत्न करुन जखमींना बाहेर बाहेर काढले आहे.

केसनंद गावच्या हद्दीत जोगेश्वरी मंदिरसमोरील वळणाला इको कार (एम एच १४ जी एच ४०२७) व मालवाहतूक कन्टेनर यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने इको गाडीचा अक्षरशः चकनाचुर झाला. अपघाताची तीव्रता खूप मोठी होती. लोणिकंद पोलिस व स्थानिक तरुणांनी एक तास अथक प्रयत्न करुन कारमध्ये अडकलेल्या जखमीना काढले बाहेर इको कार गाडीत एकूण ७ जन होते. त्यापैकी पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमी हे रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावेळी स्थानिक नागरीक, प्रवाशी तसेच माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांनी अपघातग्रस्तांना मोलाची मदत केली.

 

वळण सरळ करा अन्यथा आंदोलन करणार; चंद्रकांत वारघडे 

लोणीकंद-थेऊर रस्त्यावरील जोगेश्वरी मंदिरासमोर एक खुप मोठे वळण आहे. शेजारी वनविभागाने संरक्षक जाळी लावल्यामुळे ते वळण अजून तीव्र झाले आहे. सदर रस्त्याचे काम चालू असताना माहिती सेवा समितीच्या माध्यमातुन अनेकवेळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हे धोकादायक वळण सरळ करण्याबाबत विनंती केली. परंतु त्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे हे धोकादायक वळण सरळ न केल्याने येथे अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. प्रवशांच्या जीवाशी होणारा हा खेळ तातडीने थांबवण्यात यावा. तसेच वळण सरळ करण्यासाठी पुन्हा एकदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे. अन्यथा माहिती सेवा समितीच्या माध्यमातुन त्याच ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा चंद्रकांत वारघडे यांनी दिला.