Payal Chaudhari

प्रेमविवाहाचा तीन महिन्यातच धक्कादायक शेवट…

क्राईम

बीडः तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन संसार थाटला असतानाच युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी येथे घडली आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी येथील आदेश चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमाचं रुपांतर तीन महिन्यांपूर्वी लग्नात झाले होते. पण काही दिवसातच घरातील वातावरण खराब होऊ लागले. सासू आणि पती त्रास देऊ लागले होते. याच त्रासातून स्वत:ची सुटका करण्याचा निर्णय पायलने घेतला. पती अहमदनगरला तर सासू शेळ्या चारण्यासाठी गेली होती. यावेळी पायल हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पायलचे मामा दत्तात्रय लेकुरवाळे (रा. कुसडगांव ता.जामखेड. जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अंभोरा पोलीस ठाण्यात पती आदेश चौधरी, सासू अलका चौधरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सासू आणि पतीला अटक करण्यात आली आहे.