शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली असुन मुलींच्या पालकांना यामुळे मोठी डोकेदुःखी वाढली आहे. शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुली पळुन जाण्याचे प्रमाण सध्या शिरुर तालुक्यात वाढले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.
शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर या पोलिस स्टेशनला अल्पवयीन मुली पळुन जात असल्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत असुन अनेकवेळा सहा महिने ते एक वर्षे या मुलींचा ठावठिकाना पोलिसांना सुद्धा सापडत नाही. त्यामुळे पोलिसांना तपासातही अनेक अडचणी येत आहेत. तसेच अनेकवेळा पळुन जाऊन मुलगी लग्न करते. त्यानंतर तिला एखादं अपत्य होत. मग पालकही तक्रार मागे घेतात.
गावातील राजकीय पुढारी जबाबदार…?
एखाद्या गावातुन जर एखादी अल्पवयीन मुलगी पळुन गेली तर गावातीलच काही राजकीय पुढारी ज्याने अल्पवयीन मुलगी पळुन नेली त्याला मदत करतात. त्या जोडप्याची लांब कुठंतरी दुसरीकडे राहायची सोय करतात. त्यानंतर काही दिवसांनी त्या जोडप्याला एखादं अपत्य झाल्यानंतर गावात परत आणतात. त्यामुळे मुलीच्या पालकांचाही नाईलाज होतो. त्यामुळे या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांनी कडक भुमिका घेणे गरजेचे आहे.
शिरुर तालुक्यात शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर या पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या जेवढ्या तक्रारी आहेत. त्या सर्व तक्रारींच्या बाबतीत पोलिस हे संवेदनशील आहेत. अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला शिक्षा देण्याचीच आमची भुमिका आहे. परंतु याबाबत मुलीच्या पालकांनीही पोलिसांकडे येऊन तक्रार करण गरजेचं आहे.
प्रशांत ढोले
उपविभागीय अधिकारी (शिरुर)
शिरुर तालुक्यातील महसुल विभाग आपल्याच कामात गुंग अन वाळु माफिया मात्र वाळु चोरण्यात दंग
शिरुर शहरात गांजाचे सेवन करताना पाच जण सापडले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
शिरुर; आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रकमेचा अपहार करणाऱ्यांची आरोपींची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त