RANJANGAON

कारेगाव येथे पोलिसांची मटक्यावर कारवाई

मुख्य बातम्या

शिरुर: कारेगाव येथील यश इन चौकात असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळवित असल्याने दोन जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असुन 1) अमोल रामदास नवले (वय 26) 2) रविंद्र भगवान मोरे (वय 44) दोघेही रा. कारेगाव ता.शिरुर जि. पुणे अशी त्यांची नावे असुन याबाबत पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार (दि18) रोजी दुपारी 5 च्या सुमारास कारेगाव येथील यश इन चौकात असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मुंबई हा मटका चालू असल्याची माहीती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकला असता मटक्याचे साहित्य आणि रोख रक्कम मिळून आली तसेच दोन जणांवर गुन्हे दाखल झाले असुन पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे करत आहेत.