शिरुर तालुक्यातील तिनही पोलिस स्टेशन हद्दीत ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याबाबत DYSP नी घेतली बैठक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिस हद्दीत जातेगांव बुद्रुक आणि आरणगाव मध्ये पडलेल्या दरोड्याच्या अनुषंगाने शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याबाबत शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन या तीन ठिकाणी स्वतंत्र बैठक घेतली.

 

शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन या तीनही पोलिस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या गावातील पोलिस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते हे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याबाबत ढोले यांनी सुचना दिल्या. तसेच ज्या गावात पुर्वीपासुनच ग्रामसुरक्षा दल कार्यरत आहेत. त्यांनी परत कामाला सुरवात करावी असेही ढोले म्हणाले.

 

तसेच प्रत्येक गावातील महत्वाची ठिकाणे, मुख्य चौक आणि गावात येणारे जाणारे रस्ते या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत