(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
शिरूर तालुक्यातील आमदाबाद हे नितीन अर्जुन थोरात यांचे गाव. एकत्र शेतकरी कुटुंबातील जन्म. वडील महसूल विभागातून नायब तहसीलदार या पदावून सेवा निवृत्त झाले. नितीन थोरात यांनी एटीडी आणि जीडी आर्ट हे शिक्षण घेतले. पण, नोकरी न करता काळ्या आईची सेवा करण्याचे त्यांनी बालवयातच ठरवले. काळ्या आईची सेवा करत असताना शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे विविध प्रश्न जाणवू लागल्याने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गाव ते राजधानीपर्यंत त्यांनी मजल मारली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता म्हणून त्यांनी अल्पावधीतच ओळख निर्माण केली. त्यांच्याशी केलेली सविस्तर चर्चा…
