Onion

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान पंचनामा आणि ऑनलाइन पीक पाहणी करण्यासाठी तलाठी गावात येण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. संबंधित तलाठी गावात न येता उलट मोबाईलवरून शेतकऱ्यांशी आरेरावीच्या भाषेत बोलत असल्याची तक्रार वाघाळे (ता. शिरूर) गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘पावसामुळे आमचे पीक वाया गेले, तरी सरकारी मदतीसाठी कोणी येत नाही. वाघाळे गावासाठी दिलेला तलाठी गावात आल्याचे कोणाला आठवतही नाही. तलाठी यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उद्धटपणे उत्तर मिळतात. मी रजेवर आहे. तुम्हाला आत्ता जाग आली का? मुदत संपत आली आहे, वरती विचारणा करा, अशी त्यांची आरेरावीची भाषा असून, शेतकऱ्यांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे वाघाळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वाघाळे गावामध्ये तलाठी जर येतच नसेल तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जायचे कोणाकडे? मोबाईलवर संपर्क साधला की अरेरावीची भाषा केली जाते. वाघाळे गावामध्ये एक खासगी व्यक्तीची नियुक्ती केली असून, त्यांच्यामार्फत संबंधित तलाठी कामे करून घेत आहे. परंतु, खासगी व्यक्तीला यंत्रणेची पूर्ण माहिती नसल्यामुळे पंचनामा करण्यात अडचणी येत आहेत. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही दिवसरात्र मेहनत घेतो, पण अधिकारी गावात येऊन परिस्थितीची पाहणी करायला तयार नाहीत. नुकसान झाले तरी आम्हालाच दोष दिला जातो.” संबंधित तलाठी यांना वरिष्ठ पाठीशी घालत असल्यामुळेच त्यांची अरेरावीची भाषा आहे. संबंधितावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे अर्ज प्राधान्याने निकाली काढावेत. अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले

शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरीहितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल; डॉ. नीलम गोऱ्हे

Video; शिरुर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात; भाजीपाल्याच्या घसरलेल्या दरांचा मोठा फटका

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत