रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे किरकोळ कारणावरुन एका तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विशाल बाळासाहेब कुटे (वय ३१, रा. रांजणगाव गणपती) यांना दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास सोनेसांगवी रोडलगत महागणपती पार्किंग जवळ आरोपी रितेश संजय पाचुंदकर व त्याचे पाच अनोळखी साथीदार यांनी मोटारसायकल काढण्याच्या कारणावरुन त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली.
या सहा जणांच्या टोळक्याने हातातील कडे, लाकडी काठी तसेच स्टूलने आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक फौजदार गुलाब येळे हे करत आहेत.
रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल
शिरूर! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन स्वयंघोषित नेते धरतात अधिकाऱ्यांना वेठीस…?
शिरुरच्या स्वयंघोषित नेत्याने महसुलमंत्र्याकडे तक्रार करत महसुल व पोलिसांवर टाकला दबाव…?