सरकारच्या निष्क्रियतेमुळे तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत; ॲड. संग्राम शेवाळे

मुख्य बातम्या राजकीय

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर एका पिढीचे भविष्य अंधारात ढकलणारी भीषण वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका राज्य युवा धोरण समितीचे सदस्य ॲड. संग्राम शेवाळे यांनी मंत्रालयातील बैठकीत केली.

राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ॲड. शेवाळे यांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या धक्कादायक आकडेवारीचा दाखला देत राज्यातील आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. “तरुण आत्महत्या करत आहेत, घरे उद्ध्वस्त होत आहेत आणि सरकार मात्र योजनांच्या नावाखाली कागदोपत्री हालचाली करत आहे,” अशी कडवट टीका त्यांनी केली.

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशन केंद्र, २४ तास हेल्पलाईन आणि मानसिक आरोग्यावरील जनजागृती मोहिमा राबवण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “जर सरकार आज पावले उचलणार नसेल, तर उद्याची पिढी कायमची हरवण्याची भीती आहे,” असा इशारा त्यांनी दिला.

या बैठकीला आमदार सत्यजित तांबे, रोहीत पाटील, अभिजित पाटील, अमित गोरखे, संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे, प्रविण दटके, देवेंद्र कोठे, बाबासाहेब देशमुख, प्रकाश सुर्वे तसेच विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?

शिरुर तालुक्यात अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय जोमात; कारवाईची मागणी

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत