ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असल्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने 18 सप्टेंबर 2023 रोजी रांजणगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर संकेत संतोष महामुनी आणि प्रथमेश संतोष नवले यांना अटक करुन त्यांच्या कडून 1 गावठी पिस्टल व 3 सिनेस्टाईल कोयते जप्त करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना त्याच आरोपींकडून आणखी 4 गावठी पिस्टल जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तपासादरम्यान अटक आरोपींनी आणखी 3 गावठी पिस्टल एक जणास दिल्याची कबुली दिली आहे.

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली. शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील गणेश महाजन याला 3 गावठी पिस्टल दिल्याची कबुली दिल्याने पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी यांनी गणेश महाजन याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 3 गावठी पिस्टल व 1 जिवंत काडतुस जप्त केले आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे.

सदर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींकडून तब्बल 08 गावठी कट्टे जप्त करण्यात रांजणगाव पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या 8 झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे जप्त करण्याची ही पुणे ग्रामीण जिल्ह्यातिल पहिलीच घटना आहे. तसेच या गुन्ह्यात एकूण 2 लाख 86 हजार रुपये किमतीचे एकूण 8 गावठी पिस्टल व 6 पितळी धातुची जिवंत काडतुसे, व 3 सिनेस्टाईल कोयते जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, निळकंठ तिडके, विनोद शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी, वैजनाथ नागरगोजे, विलास आंबेकर, विजय सरजिने, माणिक काळकुटे, ब्रम्हा पोवार यांनी केली आहे. या गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.

आपला मुलगा कोणाच्या संगतीत राहतोय. शाळेत नक्की काय करतोय. त्याचे मित्र कोण आहेत. याकडे पालकांनी जाणीवपुर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन मुले चुकीच्या संगतीत बिघडत असून पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
– महेश ढवाण (पोलिस निरीक्षक), रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन

रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्टल घेणाऱ्यांचे दणाणले धाबे…

रांजणगाव MIDC पोलीसांनी पिस्टल व कोयते जवळ बाळगलेल्या दोन जणांना केले जेरबंद