जागतिक महिला दिनानिमित्त तालुकास्तरीय कर्तृत्ववान महिला सरपंच पुरस्कार वितरण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्दे सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ८ महिला सरपंच यांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी सर्वांचे सन्मान करण्यात आले.अनेक महिला मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असुन संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी आठ महिला सरपंचांना पुरस्कार देऊन सन्मान केला. त्याबद्दल त्यांचे सर्व महिला सरपंच यांनी आभार मानले.

 

महिला सरपंच गावचा कारभार यशस्वीपणे संभाळताना अनेक अडचणी येत असतात. त्याला सामोरे जात असताना, घरची जबाबदारी ही त्या पार पाडत असतात. त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळावी ,त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे म्हणून ८ सरपंच महिला यांना ‘ओम शांती सेंटर’ च्या अर्चना दिदी, शकू दिदी अनेक महिला मान्यवर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

 

अर्चना दिदी,शकू दिदी यांनीही खुप मोलाचे मार्गदर्शन केले. यांचे विचार खुप मौल्यवान असतात.’ओम शांती सेंटर’ मध्ये हा कार्यक्रम घेतल्यामुळे खुप समाधान मिळाले.सकारात्मक ऊर्जा मिळाली असे मनोगत अध्यक्षा राणी कर्डिले यांनी व्यक्त केले.

 

यावेळी रामलिंग गावच्या सरपंच शिल्पा गायकवाड, अन्नापुरच्या सरपंच दिपिका शिंदे, कर्डेलवाडीच्या सरपंच लता कर्डिले, सरदवाडीच्या सरपंच लक्ष्मी जाधव, कोंढापुरीच्या सरपंच अपेक्षा गायकवाड, बाभुळसरच्या सरपंच सोनाली फंड, कारेगावच्या सरपंच वृषाली गवारे, मलठणच्या सरपंच माधुरी थोरात या सरपंच महिला यांना ‘ओम शांती सेंटर’च्या अर्चना दिदी, शकुंतला दिदी,सुप्रिया दिदी,वासंती दिदी,वैशाली दिदी,सुमन दिदी,शोभना पाचंगे,पोलीस महिला कर्मचारी देशमुख, माकर अनेक महिला मान्यवर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी महिलां मान्यवरांचे नृत्य करुन स्वागत करण्यात आले. डॉ भालेकर यांनी मोफत निसर्ग उपचार केंद्र, तपासणी व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना दिदी यांनी केले.उपस्थित सर्वांचे आभार अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.

रामलिंग महिला उन्नतीच्या पाठपुराव्याला अखेर यश, शिरुरच्या सुलभ शौचालयाचा ठेका रद्द

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना स्वच्छ्ता किट भेट

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने सुनंदा लंघे यांना सन २०२५ चा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार