व्हॅसलीन + लिंबाचा रस: एका बाऊलमध्ये एक चमचा व्हॅसलीन घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात १० मिनिटांसाठी पाय भिजत ठेवा. नंतर कोरडे करा. यानंतर व्हॅसलीन लिंबाच्या रसाचे मिश्रण पाय आणि टाचांना लावा. ही पेस्ट रात्रभर तशीच राहू द्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाय धुवून चांगले मॉइश्चराइज करा.
केळी आणि मध: एका बाऊलमध्ये पिकलेली केळी चांगली मॅश करा. त्यात मधाचे काही थेंब घालून मिसळा. त्यानंतर अर्ध्या तासाने ते टाचांवर लावा. यानंतर कोमट पाण्याने धुवा. नंतर मऊ टॉवेलने कोरडे करा. केळीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी६ असते. जे ड्राय टाचांना मऊ करते.
व्हिनेगर + तांदळाचे पीठ + मध: एका बाऊलमध्ये २ चमचे तांदुळाचे पीठ घ्या. त्यात ५ ते ७ व्हिनेगरचे थेंब आणि एक चमचा मध घालून मिक्स करा. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात पाय भिजत ठेवा. १० मिनिटानंतर पेस्ट टाचांना लावा, आणि हलक्या हाताने घासून घ्या. काही वेळानंतर पाय स्वच्छ धुवून घ्या. तयार पेस्ट मृत त्वचा काढून टाकण्यास आणि स्किन क्लिन ठेवण्यास मदत करते.
(सोशल मीडियावरुन साभार)