आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे

आरोग्य

चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन निरोगी राहू शकतो. आवळा हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यात व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असल्याने केस, डोळे, त्वचेसाठी ते फायदेशीर आहे. आवळा रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, तसेच लठ्ठपणा दूर होतो. तसेच रोज सकाळी आवळ्याचा चहा पिण्याने देखील अनेक फायदे मिळतात. आवळा चहा प्यायल्याने पोटात साचलेली घाण बाहेर पडते. आवळा हे फळ शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते.

आवळ्याचा चहा कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय

आवळा चहा बनवण्यासाठी प्रथम २ कप पाणी उकळत ठेवावे. त्यात थोडे आले किसून टाकावे. ४-५ तुळशीची पाने घालावी. आता १ चमचा आवळा पावडर पाण्यात घालून उकळू द्यावे. जेमतेम अर्धे पाणी उरले की गॅस बंद करा आणि गाळून प्या. आता चहासारखे कोमट करुन ते पिऊ शकता. चहा व्यतिरिक्त इतर कोणत्याही पेयात अशा प्रकारे आवळा पावडर वापरू शकता. सर्व प्रथम, रिकाम्या पोटी आवळा चहा प्यायल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात साचलेली घाण सहज निघून जाते.

आवळा चहा रोज पिण्याने पचनक्रिया मजबूत होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याच्या मदतीने मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. व्हिटॅमिन-सी ने समृद्ध आवळा चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. हा चहा चयापचय गतिमान करण्याचे काम करतो, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)