लिंबाचा चहा चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. लिंबू शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि मेटाबोलिजम वाढवण्यास मदत करते. लिंबू विटामिन-सी चा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीरातील पेशींची वाढ आणि विकास होण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. विटामिन-सी लोहाची कमतरता रोखते आणि रक्तदाब व हृदयरोगाचा धोका कमी करते. लिंबाच्या चहात आले घातल्यास हे पेय सूज रोखण्यासाठी उपयुक्त असते. आले हा मळमळ व अंगदुखीवरचा उत्तम उपाय आहे. याशिवाय वारंवार भूक लागण्याच्या तक्रारीवर गुणकारी असते.
आल्यातील उच्च फायबरमुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि पचनास मदत होते. लिंबाचा चहा आरोग्यकारक बनवण्यासाठी यात साखर घालू नका. याऐवजी मध वापरा. यातील नैसर्गिक गोडवा मेटाबोलिजम वाढवतो आणि चरबी कमी करतो. आवडीनुसार यात चहा करताना कार्बनिक लेमनग्रास घालू शकता. यात अँटीऑक्सिडंट गुण असतात आणि हे त्वचा व केसांसाठी चांगले असते. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो.
लेमन टी बनवण्याची पध्दत
एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा. रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा, चहापूड कमी घालायची आहे.याला एक उकळी आणून कपात गाळून घ्या. या कपात कोमट असताना वरून लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. चव वाढवण्यासाठी आवडीनुसार यात मध (कोमट असताना) आणि आलेही घालू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)