भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे

आरोग्य

भेंडीचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये खनिजे, जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी. भेंडीत असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच यात जीवनसत्वे, खनिजे, पोषक घटक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, तसेच यात असलेल्या अँटी-ऑक्सिडंटमुळे शरीर अनेक आजारा पासून दूर राहते.

भेंडीचे पाणी कसे बनवावे

सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे देठ काढून उभे चार तुकडे करा.

रात्री एक ग्लास पाण्यात हे भेंडीचे तुकडे भिजत घाला.

सकाळी उठल्या नंतर रिकाम्या पोटी हे पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.

आरोग्यदायी फायदे

भेंडीच्या पाण्यात अघुलनशील घटक असतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. हे पाणी प्यायल्या नंतर कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होऊन आरोग्याला फायदे होतात.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी भेंडीचे पाणी फायदेशीर आहे. या पाण्यात कॅलरीज नसतात आणि शरीराला हायड्रेट राहून चयापचय वाढण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी भेंडीचे पाणी प्यायल्यास पोट काही वेळ भरलेले राहते, तसेच वजन कमी होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी भेंडीचे पाणी गुणकारी आहे. यामध्ये पाण्यात विरघळणारे फायबर असतात. जे बद्धकोष्ठतेपासून शरीराला आराम देतात. त्यामुळे सकाळी एक ग्लास भेंडीचे पाणी प्यावे.

कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी भेंडीचे पाणी प्यावे. तसेच भेंडीच्या भाजीचा आणि पाण्याचा आहारात समावेश करावा.

रोजच्या आहारात भेंडी पासून बनवलेले पदार्थ खावे. जेणेकरून आरोग्य सुधारण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)