खजूर खाण्याचे फायदे

आरोग्य
खजूराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते आणि हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. यात उच्च आणि कमी साखर पातळी दोन्ही व्यवस्थापित करण्याची गुणवत्ता आहे. यामध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने खजूर सेवन करावे.
खजूर खाल्ल्याने मेंदूचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच मेंदूच्या मज्जातंतू मधील कोणत्याही प्रकारची सूज कमी करून तणाव दूर करते. खजूर मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. दुधात भिजवून खाल्ल्यास कॅल्शियमचे प्रमाण दुपटीने वाढते. हाडांच्या बळकटीकरणात महत्त्वाची भूमिका असते. खजूर च्या सेवनाने संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या दूर होऊ शकतात. खजूर मध्ये फायबर भपूर असते. हे खाल्ल्याने पोटाचे आरोग्य सुधारते. हे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. आठवडाभर दररोज ५ खजूर खाल्ल्याने जुनाट बद्धकोष्ठता दूर होऊ शकते. त्यामुळे पोट चांगले साफ होते. खजुराचे सेवन केल्याने वजनही नियंत्रणात राहते.
(सोशल मीडियावरून साभार)