डायबिटीसने पीडित रूग्ण:- जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण नारळ पाण्यात नॅचरल शुगर असते, ज्यामुळे याचं सेवन केल्याने डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
किडनीची समस्या असेल तर:- नारळ पाण्यामध्ये हाय पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांसाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. किडनीची समस्या असलेल्या लोकांनी जर नारळ पाणी प्यायलं तर त्यांना हायपरकेलेमिया होण्याचा धोका असतो.
हाय ब्लड प्रेशर असलेले:- नारळ पाण्यात सोडिअमचं प्रमाणही भरपूर असतं. याने ब्लड प्रेशर वाढू आणि कमी होऊ शकतं. त्यामुळे नारळ पाणी ब्लड प्रेशर कमी करण्याचं औषध घेणाऱ्या लोकांनी नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.
ज्यांची सर्जरी झाली आहे:- सर्जरी दरम्यान आणि नंतर ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यात होणारी अडचण दूर करण्यासाठी ठरलेल्या सर्जरीच्या कमीत कमी एक आठवडाआधी नारळ पाणी पिणं बंद केलं पाहिजे.
(सोशल मीडियावरून साभार)