बाळ जन्माला आल्यानंतर जसं जसे ते मोठे होऊ लागते तसं तसे ते तोंडात बोट घालतात. मुलांना वारंवार तोंडात बोट घालण्याची किंवा अंगठा चोखण्याची सवय सामान्य वाटते. परंतु, ही सवय वाढत्या वयात देखील तशीच राहाते. अनेकदा असं दिसून येते की मुलांना वारंवार अंगठा चोखण्याची सवय आहे. त्यामुळे पालक सतत त्यांच्यावर ओरडत राहतात.
बाळ लहान असताना तोंडात बोटे घालत असेल तर आपल्याला वाटते त्यांना भूक लागली आहे. मुले फक्त भूक लागली म्हणून बोटे चोखत नाहीत तर त्याची इतर कारणे देखील असू शकतात. जर आपलेही मुलं वाढत्या वयात सतत अंगठा चोखत असेल तर हे ३ सोपे उपाय करुन पाहा.
अशा परिस्थितीत पालकांनी शांतपणे गोष्टी सांभाळायला हव्या.
1) पालकांनी मुलांच्या अंगठा चोखण्याच्या सवयींमध्ये व्यत्यय आणू नका. असं केल्याने मुले वारंवार अंगठा चोखत राहतात. अशावेळी त्यांना भूक लागली आहे का? काही हवं आहे का असं विचारा. ज्यामुळे आपल्याला त्याचे नेमके कारण कळेल.
2) जर मुलांची दिवसभरातून अंगठा चोखण्याची सवय आपोआप कमी झाली तर त्यांचे कौतुक करा किंवा त्यांना बक्षीस द्या. त्यांना चॉकलेट, गोडाचे पदार्थ किंवा चिप्स देऊ नका. त्यांच्या सोबत खेळा, त्यांना विविध गोष्टी सांगून बक्षीस देऊ शकता.
3) मुले जर अंगठा चोखत असतील तर त्यांना आठवण करुन द्या, आता तू मोठा झाला आहे. वारंवार तोंडात बोटे घालू नकोस. थंब गार्ड, सॉफ्ट मिटन्स किंवा हलके हातमोजे घालायला लावू शकता. त्यांना ही गोष्ट प्रेमाने समजावून सांगा.
(सोशल मीडियावरून साभार)