दूध प्यायले तर ॲसिडिटीचा त्रास वाढतो? दुधात घाला ह्या 5 गोष्टी

आरोग्य

हाडं होतील मजबूत:- ‘हाडांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. दूध व दूधयुक्त पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाडं पोलादी होतात. ज्यांना ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपेनियाचा त्रास आहे. त्यांनी दुधात हळद मिसळून प्यावे. यामुळे हाडांच्या आरोग्याला भरपूर फायदा होईल.

सर्दी – खोकल्यापासून आराम:- हिवाळ्यात सर्दी – खोकल्याचा प्रचंड त्रास होतो. ज्यांची इम्युनिटी कमी असते. त्यांना याचा त्रास होतो. यासाठी आपण दुधासोबत च्यवनप्राश मिक्स करून खाऊ शकता. यामुळे घसादुखी आणि पोटदुखीपासूनही आराम मिळतो. यामुळे पोटाचेही विकार दूर राहतात.

बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर:- जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर, आपण गायीच्या दुधात हरडची पावडर घालून दूध पिऊ शकता. यासाठी हरड किसून किंवा त्याची पावडर कोमट दुधात घाला. रामदेव बाबा यांच्या मते, ‘एका व्यक्तीने ग्लासभर दुधात २-३ ग्राम हरड पुरेसे आहे. यामुळे पोटाचे विकार दूर राहतात.’

कफ काढून टाकण्यासाठी उपाय:- थंडीत छातीत कफ जमा होण्याची समस्या सामान्य आहे. खोकल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावर मात करण्यासाठी गायीच्या दुधात मुलेठी पावडर घालून प्यावे. या उपायाने खूप फरक पडतो. कफचा त्रास दूर होतो.

अॅसिडिटीचा त्रास होईल दूर:- अनेकदा गायीचं दूध प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होतो. यासाठी गायीच्या कोमट दुधात बडीशेप घालून पिऊ शकता. यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होईल. पित्ताचाही त्रास होत असेल तर, आपण दुधात बडीशेप घालून पिऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)