आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे केस गळती सामान्य समस्या झाली आहे. बाजारात महागड्या उत्पादनांचा मारा असला तरी आपल्या किचनमध्येच नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत. आवळा आणि मेथी हेअर मास्क वापरून केस गळणे थांबवा, त्यांना पोषण द्या आणि ते लांब-दाट बनवा.
आवळा आणि मेथीचे फायदे
1) मेथीचे दाणे
प्रोटीन व लेसिथिन: केस मुळापासून मजबूत करतात.
एंटी-फंगल गुणधर्म: कोंड्याला दूर करतात.
आयर्न व निकोटिनिक ॲसिड: रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस गळणं कमी होतं.
2) आवळा
अँटीऑक्सिडंट्स: ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात.
हेल्दी फॅट्स: केसांच्या फॉलिकल्सना पोषण देतात.
एमीनो ॲसिड व प्रोटीन: केस मजबूत व चमकदार बनवतात.
3) लिंबू
व्हिटॅमिन C: स्काल्प स्वच्छ ठेवतो आणि कोलाजन बूस्ट करतो, ज्यामुळे केसांची वाढ जलद होते.
घरगुती हेअर मास्क कसा बनवाल
साहित्य
१ वाटी मेथी दाणे
२ चमचे आवळा पावडर किंवा ताज्या आवळ्याचे तुकडे
१ लिंबाचा रस
बनवण्याची पद्धत
1) मेथी दाणे रात्रभर भिजवा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा.
2) त्यात आवळा पावडर/तुकडे मिसळा
3) लिंबाचा रस टाका आणि चांगलं मिक्स करा.
4) ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा.
5) ३० मिनिटांनी साध्या पाण्याने केस धुवा.
फायदे
केस गळती लक्षणीय कमी होते.
केसांना मुळापासून पोषण मिळतं.
लांब, दाट आणि चमकदार केस मिळतात.
आठवड्यातून १-२ वेळा वापरा आणि काही आठवड्यांतच तुम्हाला फरक जाणवेल.
(सोशल मीडियावरून साभार)