नाकाचे हाड वाढणे / सर्दी पडसे होणे यावर घरगुती उपाय

आरोग्य

कारणे

१) उष्णतेची व साधी सर्दी होणे.

२) वातावरणातील बदल.

३) पोट साफ न होणे.

४) वारंवार होणारा कफ.

५) जागरण करणे.

उपाय

१) नियमित देशी गाईचे तुप नाकात टाका. किंवा बोटाने लावा. ( रात्री झोपतेवेळी आणि सकाळी उठल्यावर ) हा एक चांगला उपाय आहे.

२) आले + दालचिनी + खडीसाखर + गवती चहा + तुळशीची पाने + काळीमिरी यांचा काढा घ्या.

३) निलगिरी तेल रूमालावर टाकून वास घ्या.

४) सकाळी ७/८ तुळशीची पाने + २/३ काळीमिरी खा.

५) वारंवार गरमच पाणी प्या.

६) आले रस + तुळशीची पाने रस + मध घ्या.

७) आले + गुळ मिक्स करून गोळ्या करा. गरम पाण्यासोबत घ्या.

८) दूध + हळद + खडीसाखर घ्या.

९) २/३ चमचे कांद्याचा रस + तेवढाच मध मिक्स करून खाणे.

१०) रात्री झोपण्यापूर्वी गुळ खा. मात्र पाणी पिऊ नका. सकाळपर्यंत सर्दी गायब होईल.

११) हातापायांच्या बोटांवरी अग्र भाग (सायनस) प्रेस करा.

१२) नियमित नाकामध्ये तुप लावून प्राणायाम करा. विशेषतः भस्त्रिका व अनुलोम विलोम जास्त करा. नाकाचे हाड केव्हाच वाढणार नाही.

१३) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.

१४) आम्लपित्त होवू देऊ नका. हलका आहार घ्या.

१५) वरील कारणे मात्र कमी करा.

(सोशल मीडियावरुन साभार)