शरिरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी घरगुती उपाय 

आरोग्य

रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या करतात. या मुळातच एखाद्या प्लेट प्रमाणे दिसतात, त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली जाते.

रक्तात प्रामुख्याने तीन पेशी असतात, लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तात प्लेटलेट्स ची संख्या सर्वाधिक असते. या मोठ्या हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशी पासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे ५-९ दिवसांचं असतं.

जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात. प्लेटलेट्सची संख्या नियमित राखणे खूप महत्वाचे आहे. जर रक्तात प्लेटलेट्सची कमतरता होत असेल तर याचा अर्थ रक्तातील रोगांशी लढण्याची शक्ती कमी होते. प्लेटलेट ची संख्या निरोगी शरीरासाठी खूप महत्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत प्लेटलेट्सची संख्या कमी किंवा वाढली तर अनेक आजार होऊ लागतात. शरीरातील प्लेटलेट्स ची संख्या वाढवण्यासाठी आहारात काही आवश्यक पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे.

बीट आणि गाजर: बीटच्या रसात अधिक प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर दोन ते तीन दिवस बीटचा ग्लासभर रस प्यायल्यावर प्लेटलेट्स अधिक वाढण्याची दाट शक्यता असते.

पपई आणि पपईच्या पानांचा रस: शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपई महत्वाचा आहे. पपई नुसता किंवा त्याच्या ज्यूस प्यायला तरी फायदेशीर आहे. जमल्यास पपईच्या पानांचा रस देखील घ्यावा. पपईची पाने पाण्यात उकळावी आणि ते पाणी प्यावं. हे पाणी ग्रीन टी प्रमाणे लागेल.

भोपळ्याचा रस: भोपळा हा गुणकारी आहे. भोपळ्याचा रस ग्लासभर घेऊन त्यात २ चमचे मध घालून प्यावे. ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होईल.

गुळवेल: गुळवेलचं ज्यूस शरिरात सफेद ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करतात. डेंग्यू झाल्यावर दररोज याचे सेवन करावे. यामुळे ब्लड प्लेट्स वाढल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते.

लाल फळ आणि भाज्या: टोमॅटो, प्लम, टरबूज, चेरी यासारखी फळे आणि भाज्या खाल्यामुळे विटामिन आणि मिनिरल्स सोबतच अ‍ॅन्टी ऑक्सिडेंट्सची मात्रा वाढते. यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)