मुगाचे लाडू कसे बनवावे

आरोग्य

साहित्य

सव्वा वाटी साजूक तूप,

४ वाटी मुगाचे पीठ,

2 वाटी पिठीसाखर,

ड्रायफ्रूट आवडीनुसार

कृति 

सव्वा वाटी साजूक तूप फेटून घेणे. (वेळ – १५ मिनिट)

फेटून घेतलेल्या तुपामध्ये ४ वाटी मुगाचे पीठ घालावे व सर्व जिन्नस एकत्र करावे.

१० – १२ तास ते मिश्रण मुरून द्यावे.

नंतर ते मिश्रण मंद आचेवर दीड ते दोन तास खमंग भाजून घ्यावे, भाजलेले मिश्रण साधारण लालसर होते.

मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात १ वाटी पिठीसाखर, व आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून सर्व जिन्नस करून घ्यावे व लाडू वळावे.

अंदाजे २५ लाडू होतात.

(सोशल मीडियावरून साभार)