पिस्ते रोज खाल्ल्यास या तीन आजारांपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते!

आरोग्य

सध्याच्या आधुनिक जीवनशैलीशी निगडित असलेले तीन मोठे आजार म्हणजे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह. हे तीन रोग आज जगासाठी मोठ्या संकटाचे कारण ठरत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात एक अब्जाहून अधिक लोक जास्त वजनाचे किंवा लठ्ठ आहेत. तर 1.28 अब्ज लोक उच्च रक्तदाबाचे बळी आहेत. त्यापैकी बहुतांश गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील आहेत. मधुमेहाच्याबाबतीत बोलायचे झाल्यास WHO च्या मते, 422 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.

त्याहून चिंतेची बाब म्हणजे दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होतो. म्हणजेच सुमारे 30 दशलक्ष लोक या तीन आजारांनी त्रस्त आहेत आणि या तिन्ही रोगांचे कारण म्हणजे बैठी जीवनशैली. दैनंदिन जीवनात शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी पिस्ते रोज खाल्ल्यास या तीन आजारांपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते. पिस्ता हे सुपर हेल्दी फूड आहे.

हेल्दी फॅटसोबतच पिस्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात. त्यात असलेल्या आवश्यक पोषक तत्वांमुळे वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हा उत्तम आहार आहे. 28 ग्रॅम पिस्त्यामध्ये 159 कॅलरीज, 8 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3 ग्रॅम फायबर, 13 ग्रॅम हेल्दी फॅट, 6 टक्के पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात.

बीपी आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. पिस्त्याचे नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. पिस्त्यामध्ये असलेले उच्च अँटीऑक्सिडंट्स रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. पिस्त्यावर केलेल्या सर्व अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, त्यामुळे 67 टक्के एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते.

अशा प्रकारे रक्तातील साखर कमी होते – इतर ड्रायफ्रुट्समध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असले तरी पिस्त्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. म्हणजे पिस्त्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित राहते. एका अभ्यासात असे आढळून आले की, पिस्त्याचे सेवन केल्याने रक्तातील निरोगी साखर वाढते. आणखी एका अभ्यासात असे आढळून आले की, 56 ग्रॅम पिस्त्याने रक्तातील साखर 20 ते 30 टक्क्यांनी कमी होते. पिस्त्यामध्ये असलेले फायबर, अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स, फिनोलिक कंपाऊंड्स, कॅरोटीनोइड्स यांसारखे घटक रक्तातील साखर पूर्णपणे नियंत्रणात आणतात.

(सोशल मीडियावरुन साभार)