शेतकऱ्यांसाठी खूशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईत मोठी वाढ…

महाराष्ट्र

मुंबई: राज्य सरकरने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिला असून नुकसान भरपाईच्या रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ केली आहे.

एवढी मिळणार नुकसान भरपाई

जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर एवजी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे.

बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रती हेक्टर एवजी २७ हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत.

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८ हजार प्रती हेक्टर

ऐवजी ३६ हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत. महसूल आणि वनविभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 ५ हजार ४३९ कोटींच्या निधीची तरतूद

जून आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. यानंतर झालेल्या नुकसानीसाठी मदतीची मागणी केली जात होती. यानंतर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर पावसामुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ५ हजार ४३९ कोटींचा निधी तरतूद करण्यात आला आहे.